१५ व्या वित्त आयोगाच्या निधीवरून आ. राजू खरे आक्रमक अधिकाऱ्यांना दिला इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 7, 2026

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीवरून आ. राजू खरे आक्रमक अधिकाऱ्यांना दिला इशारा

 १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवरून आ. राजू खरे आक्रमक अधिकाऱ्यांना दिला इशारा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा थेट जनतेचा निधी असून त्यावर लोकप्रतिनिधींचा अधिकार आहे, असे प्रतिपादन आमदार राजू खरे यांनी केले आहे. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांनुसारच त्यांच्या संबंधित भागाला निधी मिळाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी १५ व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद सदस्यांना वाटपा संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतली.या भेटीनंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना आ. खरे यांनी पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर परिसरातील परिस्थितीवर भाष्य केले. मोहोळमध्ये सत्ताधारी पक्षाचे ७ आणि विरोधी पक्षाचे ५ सदस्य आहेत. मात्र, तिथे ७ कोटी ४० लाखांचा निधी फक्त सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पराभूत उमेदवारांनी सुचवलेली कामे घेतली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलताना आ.खरे यांनी मोहोळमधील मालकशाही संपवून जनतेने मला विधानसभा निवडणुकीत तब्बल ३१ हजार मताधिक्याने निवडून दिले आहे. त्यामुळे आता ही मनमानी आणि लोकशाहीची गळचेपी अजिबात चालणार नसल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवरून संबंधित गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ताकीद दिली आहे. १५ व्या वित्त आयोगाचा चुकीचा आराखंडा मंजूर केला जाऊ नये. अधिकारी जर मनमानी पद्धतीने कारभार करत असतील, तर हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आमदार राजूं खरे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages