महिलेच्या अग्निसंस्काराच्या ठिकाणी उकरून कवटीसह कमरेवरील भाग गायब - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 12, 2026

महिलेच्या अग्निसंस्काराच्या ठिकाणी उकरून कवटीसह कमरेवरील भाग गायब

 महिलेच्या अग्निसंस्काराच्या ठिकाणी उकरून कवटीसह कमरेवरील भाग गायब

दागिन्यांच्या संशयावरून मृतदेहाची विटंबना? परिसरात प्रचंड खळबळ; पोलिस तपासाची मागणी




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त): टेंभुर्णी परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मृत्यू झालेल्या रूपाली जगताप यांच्या अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी सावडण्याच्या विधीसाठी नातेवाईक शेतात गेले असता, अग्निसंस्कार केलेल्या ठिकाणी उकरून छेडछाड केल्याचे आढळून आले.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कमरेपासून वरचा संपूर्ण भाग, कवटीसह, तेथून गायब होता. संबंधित ठिकाण साफ करण्यात आल्याचेही दिसून आले. या प्रकारामुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत महिलेच्या अंगावर अंत्यसंस्कारावेळी सोन्याचे दागिने असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. त्यामध्ये लहान सोन्याच्या पोतीमध्ये ओवलेले सुमारे ४० मणी, मोठे ६ मणी, दोन डोरल्या (अर्धा ग्रॅमच्या), डोरल्याजवळील ६ मणी, जोडवी तसेच सोन्याची नथ यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दागिन्यांच्या उद्देशाने हा प्रकार घडला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
घटनास्थळी एका महिलेची भिजवलेली ओढणी तसेच गायछाप तंबाखूची रिकामी पुडी आढळून आल्याचा दावाही करण्यात आला आहे. या वस्तूंच्या आधारे तपास करून संबंधितांचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अशा स्वरूपाचे प्रकार गेल्या दोन वर्षांपासून परिसरात घडत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
या अभूतपूर्व घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अशा अमानुष प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व बाबींची सखोल चौकशी करावी, तसेच दोषींना तातडीने अटक करावी, अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages