जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी किरण मुसळे
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी किरण
मुसळे-कुलकर्णी यांची पदस्थापना करण्यात आली आहे. राज्यातील निवडश्रेणी मिळालेल्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना नुकतीच पदस्थापना देण्यात आली असून, सोलापुरातील रिक्त पदावर मुसळे-कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या डॉ. राणी ताटे यांची बदली झाल्याने अध्यक्षपद रिक्त होते.
सोलापूरचा अतिरिक्त पदभार धाराशिव जिल्ह्यातील समितीचे अध्यक्ष प्रकाश अहिरराव यांच्याकडे देण्यात आला होता. आता सोलापूर समितीला किरण मुसळे कुलकर्णी यांच्या माध्यमातूनपूर्णवेळ अध्यक्ष मिळाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव
जागेवर विजयी झालेल्या उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्रांचा विषय सध्या चर्चेत आहे. जिल्ह्यातील जवळपास २१ सदस्यांच्या प्रमाणपत्रांबाबत सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीवर येत्या काळात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment