रेल्वे वेळेवर चालविण्याची अशोक कामटे सामाजिक संघटनेची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 6, 2026

रेल्वे वेळेवर चालविण्याची अशोक कामटे सामाजिक संघटनेची मागणी

  रेल्वे वेळेवर चालविण्याची अशोक कामटे सामाजिक संघटनेची मागणी 



सांगोला (कटूसत्य वृत्त):-   मध्य रेल्वेच्या सोलापूर, पुणे विभागातून धावणाऱ्या रेल्वेला दररोज उशीर होत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी असून या सर्व रेल्वे वेळेवर चालवावेत अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सोलापूर व पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
22155 & 22156 कलबुर्गी- कोल्हापूर सुपरफास्ट रेल्वे सातत्याने 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत असते, 11027 दादर -सातारा एक्सप्रेस देखील 45 ते 50 मिनिटे कायम विलंबाने धावत असते, मिरज- कुर्डूवाडी पॅसेंजर या रेल्वेला कोणताच भरोसा नाही धावली तरच वेळेवर धावते अन्यथा क्रॉसिंग करिता अर्धा ते एक तास सांगोला ,पंढरपूर, मोडलिंब या स्टेशनवर थांबून असते. 
11027 दादर- सातारा रेल्वे कुर्डूवाडी येथे इंजिन दिशा 
बदलण्याकरिता 20-25 मिनिटे वेळ असताना कुर्डूवाडीत रेल्वे विनाकारण 50 ते 55 थांबवून ठेवली जाते त्यामुळे प्रवासी अक्षरशा वैतागले आहेत. 
कलबुर्गी- कोल्हापूर सोलापुरातून कुर्डूवाडी ,पंढरपूर ,सांगोला व मिरज येथून ये -जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या पासधारक मोठ्या प्रमाणात आहेत या ठिकाणी गाडी ठरलेल्या निर्धारित वेळेत पोहोचत नसल्याने कार्यालयीन नोकरदारांना दररोज लेट मार्क पडत आहे तरी प्रशासनाने या सेवा दररोज वेळेत सुरळीत चालवाव्यात. आता नव्याने 01451 & 01452 
10 ऑक्टोंबर पासून कोल्हापुरातून सकाळच्या सत्रातील कोल्हापूर - कलबुर्गी -कोल्हापूर ही रेल्वे सेवा देखील वेळेत चालवावी, गाडीचा लूज मार्जिन वेळ कपात करून वेळेत पोहोचवावी तरच प्रवाशांना या गाडीचा लाभ होईल नाहीतर पाठीमागील वर्षी 2-3 तास दररोज विलंबाने धावत होती त्यामुळे ही गाडी तोट्यात जाऊन बंद केली.व रेल्वेचे उत्पन्न वाढेल 
या भागातील दररोज प्रवास करणारे प्रवासी अक्षरशः कंटाळून गेले आहेत. या गाड्यांना सुपरफास्ट, एक्सप्रेस दर्जा असूनही विलंब कोणत्या कारणाने होतो हा प्रश्न अजूनही प्रवाशांना अनुत्तरीत आहे. नोकरदार ,विद्यार्थी यांचा या अवेळी मुळे प्रचंड नुकसान होत आहे रेल्वे प्रशासन गांभीर्याने या समस्येकडे कधी लक्ष देणार असा सवाल प्रवाशांना पडत आहे. 
तरी या रेल्वे सेवा वेळेवर चालवाव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages