पीबीएसच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे - डॉ. गणेश राव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 6, 2026

पीबीएसच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे - डॉ. गणेश राव

 पीबीएसच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे - डॉ. गणेश राव 

पुणे बिझनेस स्कूलमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न 



पिंपरी, पुणे(कटूसत्य वृत्त):-   कॉर्पोरेट क्षेत्रात सक्षम नेतृत्व घडविण्यासाठी पुणे बिझनेस स्कूलचा दोन वर्षाचा व्यवस्थापन अभ्यासक्रम मार्गदर्शक आहे. याठिकाणी उच्च शिक्षणाबरोबरच नेतृत्व आणि व्यावसायिक सक्षमता, नाविन्य, बदलत्या व्यावसायिक वातावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होईल, त्याचा पीबीएस च्या विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले करिअर घडवावे आणि देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे असे मार्गदर्शन पीबीएसचे संचालक व प्राचार्य डॉ. गणेश राव यांनी केले. 
    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पुणे बिझनेस स्कूल मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीबीएसच्या डीन डॉ. मीनाक्षी त्यागी, मास्टर कार्डचे मध्यपूर्व आफ्रिका आणि युरोप संचालक हेमंत शर्मा, इंडिया डिजिटल ॲग्रीकल्चर कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत त्यागी, संचेती हेल्थकेअर ॲकॅडमीचे मानव संसाधन प्रमुख अजंता डे, बायर ग्लोबल प्रोक्युरमेंट व्यवस्थापक सीमा मोहंती, केपीआयटी संचालक मृणाल मजुमदार, नाऊ यू सीड इंडिया प्रा. लि. विपणन उपाध्यक्ष संदीप कुलकर्णी, व्हर्लपूल इंडिया उपव्यवस्थापक दिनेश शिंदे, टाटा मोटर्स डीजीएम प्रमुख अर्चना सराफ, झायडस बायोलॉजिक्स शिक्षण आणि विकास प्रमुख विवेक शर्मा, फर्टिओनिक्स सोल्युशन्स एलएलपी संचालक जितेंद्र कोळपे आदी उपस्थित होते. 
      यावेळी डॉ. मीनाक्षी त्यागी यांनी सांगितले की, पीबीएस मधील प्रवेश म्हणजे उद्योगांसाठी व्यवस्थापकीय क्षमता, नैतिक मूल्ये आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची वचनबद्धता आणि आत्मविश्वास असणारे सक्षम नेतृत्व घडवणे होय. येथे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, मार्गदर्शन, औद्योगिक भेटी यांच्या माध्यमातून नावीन्य आणि व्यावसायिक उत्कृष्टतेवर भर असलेल्या एका नवीन शैक्षणिक मार्गाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगताच्या अपेक्षा समजून घेण्याची आणि नेतृत्व, करिअर विकास व बदलत्या व्यावसायिक वातावरणाबद्दल अधिक माहिती दिली जाते असे डॉ. त्यागी यांनी सांगितले.
    यावेळी कॉर्पोरेट प्रतिनिधींनी नेतृत्वाची जबाबदारी आणि विविध क्षेत्रांतील उदयोन्मुख संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वागत समारंभ चे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages