नेताजी प्रशालेच्या शिवा हडपदला सॉफ्ट टेनिसमध्ये सुवर्णपदक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 7, 2026

नेताजी प्रशालेच्या शिवा हडपदला सॉफ्ट टेनिसमध्ये सुवर्णपदक

 नेताजी प्रशालेच्या शिवा हडपदला सॉफ्ट टेनिसमध्ये सुवर्णपदक




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवा हडपद याने शहरस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून त्याची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय व सॉफ्ट टेनिस असोसिएशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. १९ वर्षांखालील गटात शिवाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रातून त्याचे कौतुक होत आहे. त्याला प्रशालेचे क्रीडा शिक्षक विठ्ठल कुंभार व अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्राचार्य रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकवृंदांनी त्याचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages