श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ आयोजित स्व अरविंदभाई जव्हेरी स्मृती व्याख्यानमालेचे
गुजरातीत आशु पटेल तर मराठीत अभय टिळक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री. सोलापूर गुजराती मित्र मंडळाव्दारे प्रतिवर्षाप्रमाणे यंदा रविवार दि. 06 सप्टेंबर रोजी मंडळाचे माजी ट्रस्टी स्व. अरविंदभाई जव्हेरी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ स्मृति व्याख्यनमालेचे आयोजन होत आहे. आहे. यंदा गुजरातीत मुंबई येथील प्रसिध्द गुजराती पत्रकार, लेखक , अभिनेता आणि दिग्दर्शक श्री.आशु पटेल यांचे "लाईफ अनलिमिटेड टॉक शो’’ या विषयावर व्याख्यान दुपारी ४ वाजता व मराठीत पुण्याचे श्री. अभय टिळक यांचे ‘बेरोजगारी कि रोजगार क्षमता ’ या विषयावर सायं. ६. ३० वाजता व्याख्यान होणार असुन यंदा या व्याख्यानमालेचे 26 वे वर्ष असल्याचे सचिव जयेश पटेल यांनी सांगितले.
श्री. आशु पटेल पत्रकारितेत 3 दशकांचा अनुभव असलेले आशु पटेल यांनी इंडियन एक्सप्रेस समूहाचे 'समकालीन', 'संदेश', 'मुंबई समाचार', 'अभियान', टाईम्स ऑफ इंडियाचे 'फेमिना' (गुजराती), 'युवदर्शन', 'गुजरात मित्र', 'मिड-डे', 'गुजरात गार्डियन', 'गुजरात समाचार', 'दिव्य भास्कर' यांसारख्या आघाडीच्या वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये काम केले आहे.सध्या ते द्विभाषिक चित्रपट 'द सायलेंट झोन' चे लेखक-दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. तसेच ते प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जे.जे. रावल यांच्या 'इंडियन प्लॅनेटरी सोसायटी' मध्ये सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत.
श्री. अभय टिळक हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी, पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेमधून त्यांनी एम.फिल. ची पदवी प्राप्त केली. अर्थशास्त्रीय लेखन-संपादन-संशोधन या क्षेत्रात ते १९६५ सालापासून सक्रिय आहेत. वारकरी संप्रदायाशी त्यांचा १९६० सालापासून अनुबंध आहे. श्री क्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान समितीवर विश्वस्त म्हणून २०१५ ते २०२२ या कालात ते नियुक्त होते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत तुकाराममहाराज अध्यासनाचे प्रमुख म्हणून २०१८ ते २०२३ या कालावधीत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. पुण्यातील भारतीय अध्यात्मवर्धिनी या संस्थेचे मानद संचालक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. तसेच, त्याच संस्थेच्या अधिशोधनपत्रिका या नियतकालिकाचे संपादनही ते करतात.
हे दान्ही व्याख्यान गुजरात भवनच्या वातानुकुलीत हॉल मध्ये संपन्न हाणार असून हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे मंडळाचे अध्यक्ष श्री. मुकेश मेहता यांनी आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment