रिलस्टार समीर शेख यांनी मागितली चिमुकल्यासाठी मदतीची भीक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 1, 2026

रिलस्टार समीर शेख यांनी मागितली चिमुकल्यासाठी मदतीची भीक

 रिलस्टार समीर शेख यांनी मागितली चिमुकल्यासाठी मदतीची भीक




मोहोळ (कटूसत्य वृत्त) कोणी प्रसिद्धीसाठी रिलीज बनवतो तर कोणी समाजसेवेसाठी त्याचा भाग एक म्हणून मोहोळ येथील स्टार समीर शेख यांनी पुण्यामध्ये राहणाऱ्या हालाखीची परिस्थिती असणाऱ्या एका परिवारातील हृदय नावाच्या अकरा महिन्याच्या मुलाला एसएमए टाईप १ हा एक अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर अनुवांशिक (genetic) आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील स्नायू आणि मज्जातंतू (nerves) हळूहळू पूर्णपणे निकामी होतो तो मुलगा स्वतःहून हालचाल करू शकत नाही असा आजार असल्याने त्याच्या उपचारासाठी दहा कोटी रुपये किमतीच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. हा खर्च करणे परिवाराला शक्य नसल्याने समाज भावनेतून काम करणाऱ्या मोहोळ येथील सुप्रसिद्ध रील स्टार समीर शेख यांनी रील्स बनवून आणि सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात जाऊन ह्रदय या बाळाचे फोटो असलेले पोस्टर हातात घेऊन उभे राहून मदत मागितली. आणि प्रत्येकाने मदत करावी असे आव्हान केले.


सोशल मीडिया आणि इन्स्टग्राम चा योग्य वापर करत समीर शेख यांनी माणुसकी दाखवली आणि अजून सुद्धा ते त्या बाळाच्या मदतीसाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन मदतीचा हात पसरवत आहेत .
प्रत्येक जण स्वतःसाठी मागतो समीरने मात्र एका चिमुकल्या जीवासाठी मदत मागितली.  मोहोळमध्ये जे कोणी केल नाही ते समीर शेख (रील्सस्टार) यांनी केले आणि माणुसकी अजून ही जिवंत आहे ते सिद्ध करून दाखवले. 


चौकट

समीर शेख यांची चिमुकल्या हृदय साठी कविता

प्रिय हृदय… 
एक छोटंसं आयुष्य, एक मोठी लढाई 
अवघं अकरा महिन्यांचं आयुष्य,
नजरेत अजून निरागस स्वप्नं आहेत,
हसण्याच्या या छोट्याशा वयात,
हृदयच्या वाट्याला मात्र अश्रू आहेत…
नाही कळत त्याला आजार काय असतो,
नाही कळत मृत्यू म्हणजे काय,
आईच्या कुशीत विसावण्याचं वय त्याचं,
पण नियतीशी लढतोय तो आज…
छोटेसे हात, छोटीशी पावलं,
पण लढण्याची जिद्द आभाळाएवढी,
मृत्यू दाराशी उभा असला तरी,
हृदयची आस आहे जगण्याची मोठी…
आईच्या डोळ्यात एकच प्रश्न,
“माझ्या लेकराला वाचवाल ना?”
बाबांच्या डोळ्यात दडलेली वेदना,
“माझं हृदय मला परत द्याल ना?”
आज हृदय एकटं नाहीये,
त्याच्यासोबत हजारो हात आहेत,
कुणी प्रार्थना करतंय देवाकडे,
तर कुणी मदतीसाठी पुढे येत आहेत…
थोडीशी मदत तुमची,
कदाचित त्याचं आयुष्य वाचवेल,
तुमच्या एका छोट्याशा योगदानाने,
एका आईच्या कुशीत पुन्हा हसू फुलेल…
पैसा मोठा नसतो माणसा,
मोठं असतं तुमचं मन,
हृदयसाठी केलेली छोटीशी मदतही,
ठरू शकते त्याच्या आयुष्याचं कारण…
देवा, या छोट्याशा हृदयाला,
आणखी एक संधी दे जगण्याची,
आईच्या कुशीत पुन्हा हसण्याची,
आणि बाबांच्या हातात हात देऊन चालण्याची…
हृदयला फक्त जगायचं आहे,
त्याला अजून खूप काही पाहायचं आहे…
चला, आपण सगळे मिळून त्याच्या लढाईत सहभागी होऊया,
आणि एका छोट्याशा हृदयाला
पुन्हा आयुष्याची धडधड देऊया…

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages