शहरस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाला विजेतेपद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 10, 2026

शहरस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाला विजेतेपद

 शहरस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाला विजेतेपद 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हरिभाई देवकरण प्रशाला येथे दि. 9 व 10 ऑक्टोबर दरम्यान सुरू असलेल्या शहरस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी संघाने रोशन प्रशालेस 2-0 या फरकाने हरवून विजय संपादन केले...

 पुणे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली...

 या सर्व यशस्वी खेळाडूंना नॅब संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष माजी आमदार मा.प्रकाशजी यलगुलवार , जनरल सेक्रेटरी मा.के.डी.पाटील , जनरल सेक्रेटरी मा.शशीभूषण यलगुलवार , उपाध्यक्ष मा.अनुगीता पवार , सहसेक्रेटरी मा.सीमा श्रीगोंदेकर , मुख्याध्यापक मा.डॉ.हणमंत नारायणकर यांनी अभिनंदन केले...

 या सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक मा.खंडू शिंदे , क्रीडा शिक्षक मा.सुभाष माने , मा.गणपती कोळी व प्रशिक्षक वेदांत तलकोकुल यांचे मार्गदर्शन लाभले...

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages