विठ्ठलवाडीच्या श्री विठ्ठल वाचनालयात गांधी व शास्त्री जयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

विठ्ठलवाडीच्या श्री विठ्ठल वाचनालयात गांधी व शास्त्री जयंती साजरी

 विठ्ठलवाडीच्या श्री विठ्ठल वाचनालयात गांधी व शास्त्री जयंती साजरी 



माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे माजी अध्यक्ष आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांनी सांगितले की, थोर महापुरुषांचे महान कार्य व विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. महापुरुषांप्रमाणे प्रत्येकाने आपले ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व पाठपुरावा केला पाहिजे. गावोगावचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कृतीतून व आचरणातून सामाजिक आदर्श प्रस्थापित केला पाहिजे.गावोगावच्या ग्रामपंचायत,विकास सोसायटी,पतसंस्था, वाचनालये आदी सार्वजनिक संस्थांमध्ये थोर महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध प्रकारचे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,उपाध्यक्ष बालाजी गव्हाणे,सचिव नेताजी उबाळे,भारत कोकाटे, शिवाजी जाधव,शिवाजी कोकाटे,ग्रंथपाल अमोल जाधव,पतसंस्थेचे संचालक अविनाश माने,मॅनेजर भिमराव नागटिळक, गोपीनाथ मस्के,धनाजी शेंडगे,बबलू शेंडगे यांच्यासह ग्रामस्थ व वाचनालयाचे सभासद उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages