हदगाव मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्या प्राधान्याने सोडवा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 20, 2026

हदगाव मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्या प्राधान्याने सोडवा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

हदगाव मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्या प्राधान्याने सोडवा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर



मुंबई(कटूसत्य वृत्त):-नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. तसेच नवीन वीज उपकेंद्रांची उभारणी, रोहित्रांची क्षमता वाढविणे आणि वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

हदगाव मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी मतदारसंघातील कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, लांब अंतरावरील उपकेंद्रांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि नवीन उपकेंद्रांची आवश्यकता याबाबत मागण्या मांडल्या.मतदारसंघातील मानवाडी येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. तसेच लोहा, मुदखेड आणि इतर प्रस्तावित उपकेंद्रांच्या कामांची सद्यस्थिती तपासून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

निगहा बाजार, रावणगाव, रुई, बेलमंडळ आणि चाफळा येथील उपकेंद्रांच्या प्रस्तावांसह अतिरिक्त रोहित्रांची आवश्यकता, वीजवाहिन्यांचे काम आणि शेतीपंपांना सुरळीत वीजपुरवठा या विषयांचाही आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रस्तावांची पुनर्तपासणी करून आवश्यक कामांचा समावेश आगामी नियोजनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या.हिमायतनगर परिसरात ५ एमव्हीए क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले असून तळणी येथेही रोहित्र सुरू करण्यात आले आहे. उर्वरित प्रस्तावित कामांची तांत्रिक व्यवहार्यता तपासून ती मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली. तसेच आवश्यकतेनुसार कंत्राटी मनुष्यबळ आणि काम करणाऱ्या एजन्सींची संख्या वाढविणे, स्थानिक पातळीवर मनुष्यबळ उपलब्ध करणे आणि मंजूर कामांची अंमलबजावणी जलदगतीने करणे यावरही बैठकीत भर देण्यात आला.

यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक चंद्रमणी मिश्रा, कार्यकारी संचालक (वितरण) अंकुर कवळे, कार्यकारी संचालक सुनील काकडे, कार्यकारी संचालक भुजंग खंडारे, अधीक्षक अभियंता (वितरण) नितीन काळे, अधीक्षक अभियंता संजय खंडारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages