ज्येष्ठांनी पुढील पिढीला अनुभवाचे विचाररूपी कर्ज द्यावे! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 23, 2026

ज्येष्ठांनी पुढील पिढीला अनुभवाचे विचाररूपी कर्ज द्यावे!

 

ज्येष्ठांनी पुढील पिढीला अनुभवाचे विचाररूपी कर्ज द्यावे!

मार्डीत गोपाष्टमीनिमित्त विवेक घळसासी यांचे प्रतिपादन; शहाजी पवार, इंद्रजित पवार यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन



उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त) : समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढील पिढीला परतफेडीची अपेक्षा न ठेवता आपल्या अनुभवातून मिळालेले विचाररूपी कर्ज द्यावे. या विचारांच्या शिदोरीतून गावात प्रेम, आपुलकी आणि एकोपा वाढेल. ‘एक गाव, एक कुटुंब’ अशी जिव्हाळ्याची भावना निर्माण झाल्यास समाजासह देशाची ताकदही वाढेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांनी केले.

मार्डी येथे गोपाष्टमीनिमित्त भाजपचे नेते शहाजी पवार आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या वतीने गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवाळी फराळ आणि विवेक घळसासी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विवेक घळसासी यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पवार बंधूंचे वडील गुलचंद पवार यांच्या हस्ते घळसासी यांचा सत्कार करण्यात आला. शहाजी पवार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा अनुभवसंपन्न ठेवा आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि विचारांचा लाभ नव्या पिढीला मिळणे आवश्यक आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

यावेळी पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे, सरपंच प्रांजली पवार, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, अविनाश महागावकर, प्रशांत बडवे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोहर जगताप, बाळासाहेब देशमुख, ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष मल्हारी काळे, काशीनाथ कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता मोकाशी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages