सेवा संकल्प अभियानांतर्गत सेवाज्योत यात्रा बाईक रॅलीतून जनजागृती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 10, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत सेवाज्योत यात्रा बाईक रॅलीतून जनजागृती

 सेवा संकल्प अभियानांतर्गत सेवाज्योत यात्रा बाईक रॅलीतून जनजागृती

अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन




 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सेवा संकल्प अभियानांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती व अभियानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने सेवाज्योत यात्रा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते करण्यात आले.

या बाईक रॅलीमध्ये विराट स्पोर्ट्स पोलीस भरती करिअर अकॅडमीचे विद्यार्थी, दयानंद महाविद्यालय व संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी तहसीलदार निलेश पाटील, क्रीडा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड, क्रीडा अधिकारी इलियास पठाण आणि सहायक महसूल अधिकारी मल्लिनाथ लकडे यांनी सेवाज्योत हातात धरून रॅलीत सहभाग नोंदविला.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, अभियानाचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांचा सामाजिक उपक्रमांमधील सहभाग वाढविणे हा या रॅलीच्या आयोजनामागील उद्देश होता. रॅलीमध्ये विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages