नवदुर्गा माता मंदिरात यंदा गंगाआरती दर्शन; नवरात्रोत्सवात विविध धार्मिक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 12, 2026

नवदुर्गा माता मंदिरात यंदा गंगाआरती दर्शन; नवरात्रोत्सवात विविध धार्मिक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

 नवदुर्गा माता मंदिरात यंदा गंगाआरती दर्शन; नवरात्रोत्सवात विविध धार्मिक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन





सोलापूर  (कटुसत्य वृत्त):- जोडभावी पेठ येथील  जय भारत नवरात्र महोत्सव तरुण मंडळ संचलित नवदुर्गा माता मंदिर समितीच्या वतीने यंदाचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मंडळाचे यंदाचे ८४ वे वर्ष असून नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे  वाराणसी येथील जगप्रसिद्ध गंगाआरती दर्शनाचा कार्यक्रम* आयोजित करण्यात आला आहे.


जय भारत नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना सन  १९४२ मध्ये करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात मंडळाच्या माध्यमातून परिसरातील नागरिक व युवकांना एकत्रित करून धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. सन १९४२ पासून घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आजतागायत कायम आहे.


कै. नीलकंठप्पा कलशेट्टी, चन्नप्पा पसारगे, इरप्पा उळागड्डे व कै. सिद्रामप्पा व्हंड्राव* यांच्या पुढाकारातून नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर कालांतराने मंडळाची धुरा कै सोमशेखर व्हंड्राव यांनी समर्थपणे सांभाळली. परिसरातील युवकांना एकत्रित करून नवरात्रोत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांना त्यांनी चालना दिली.


देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने सन २००३ मध्ये नवदुर्गा माता मंदिराची स्थापना  करून भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली.मंदिर उभारणीमध्येसिद्धेश्वर नाडार, संजय होमकर,भीमाशंकर पदमगोंडा, नारायण सुरवसे, शेखर सुरवसे, नागेंद्र धनोरे, नागेश व्हंड्राव, यशवंत चव्हाण, आप्पासाहेब पसारगे यांचे मोलाचे योगदान आहे. मंदिराच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.


मंडळाच्या वतीने  रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप, पाणपोई, गरजू नागरिकांना दिवाळी किटचे वाटप, फराळ वाटप* यांसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देण्याची परंपरा मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे.


यंदाच्या नवरात्रोत्सवात रमेश धनुरे यांच्या अध्यक्षाखाली वाराणसी येथील जगप्रसिद्ध  गंगाआरती दर्शनाचा विशेष धार्मिक उपक्रम* आयोजित करण्यात आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages