अकलूज येथे शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2026

अकलूज येथे शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात शुभारंभ

 अकलूज येथे शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात शुभारंभ





अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहपूर्ण व व भक्तीमय वातावरणात सुरवात झाली आहे.सकाळी अकलूज येथील अकलाई देवीच्या मंदिरात पहाटे पाच वाजता देवीची पूजा करून घटस्थापना करण्यात आली तर पहाटेपासून तालुक्यातील विविध गावातील नवरात्र मंडळातील तरूण कार्यकर्त्यानी ज्योत घेवून आपल्या मंडळाकडे धावत घेवून जात होते.
       अकलूज गावची ग्रामदैवत श्री अकलाई देवीची महापुजा सुवर्ण अलंकार घालून सिंहासनवर अरूढ करण्यात आली.त्यानंतर अकलाई देवीचे पुजारी गुरव परिवार यांनी घटस्थापना केली.सायंकाळी पाच वाजता अकलूज शहरातील सार्वजनिक मंडळांची पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.विजय चौक येथे अकलूज नगरपरिषद व मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने देवींना पुष्पहार हार घालून मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार नगराध्यक्ष रेश्मा आडगळे,नगरसेवक क्रांतीसिंह माने- पाटील,सयाजीराजे मोहिते- पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी नगरसेवक मोहसिन शेख,युवराज दोरकर, मिलींद कोतमीरे,उज्वला सुरवसे, रेश्मा तांबोळी,अझरुद्दीन शेख, सुनिल काशीद,सागर बनसोडे, नितीन काकडे इतर कर्मचारी उपस्थित होते.या मिरवणूकीत एकूण नऊ सार्वजनिक मंडळे सहभागी झाले होते.
              या मिरवणूकीत सर्वच सार्वजनिक मंडळानी अकलूज पोलीस स्टेशनच्या आदेशाला मान देत नो डिजे नो डाॅल्बी वाजवता पारंपारिक वाद्य हालगी,लेझीम,तुतारी,ढोलताशा,बँजो वाजवत अकलूज शहरातून मिरवणूक काढण्यात आली.रात्री उशीरापर्यंत देवीची प्रतिष्ठापनेचे विधी चालू होते.अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने शिस्तीत व शांततापूर्ण मिरवणुक पार पडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages