विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा- शरद मोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2026

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा- शरद मोरे

 विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा- शरद मोरे




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पुणे येथील एस. एम. जोशी पुलाजवळ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शरद मोरे यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड होता कामा नये. त्यांच्या न्याय्य मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका मोरे यांनी मांडली. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते. या आंदोलनास्थळी पुढे बोलत असताना शरद मोरे म्हणाले की,स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाची वर्षे अभ्यासासाठी समर्पित करतात. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते यश मिळविण्याचा प्रयत्न करतात. या काळात त्यांना आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक अडचणींचाही सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या मेहनतीला योग्य न्याय मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केवळ आंदोलन म्हणून न पाहता त्यांच्या भविष्याशी निगडित गंभीर विषय म्हणून शासनाने पाहावे, असे मत शरद मोरे यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी वारंवार रस्त्यावर उतरावे लागणे ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या वेळेचा, मेहनतीचा आणि भविष्याचा विचार करून शासनाने त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढावा आणि त्यांना दिलासा द्यावा. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शरद मोरे यांनी स्पष्ट केले. त्याच मध्यरात्री आंदोलनस्थळी राज्य सरकारचे प्रतिनिधी तथा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सरकारने आंदोलकांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages