शिक्षकाला धमकावणाऱ्या धनसिंग राठोड यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2026

शिक्षकाला धमकावणाऱ्या धनसिंग राठोड यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन

 शिक्षकाला धमकावणाऱ्या धनसिंग राठोड यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर मध्य विधानसभा मतदारसंघात BLO म्हणून राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला धमकी दिलेल्या धनसिंग राठोड यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार स्मिता गायकवाड यांच्याकडे दिल्याची माहिती पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे महासचिव सुनील चव्हाण यांनी दिली.
 डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, शिवछत्रपती शिक्षक संघटना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
 बीएलओ ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकाला  उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील सेवक धनसिंग राठोड यांनी फोनवरून अत्यंत अरेरावीची, उद्धट आणि अपमानस्पद भाषा वापरून धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी  सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून, संबंधित सेवकावर तातडीने कडक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शिक्षकांनी दिला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील सेवक धनसिंग राठोड यांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावत असलेल्या शिक्षकाला फोन केला. या संभाषणादरम्यान राठोड यांनी संबंधित शिक्षकाला "तुझा करेक्ट कार्यक्रम करतो", "तुला पाहून घेतो", "तुला काय फाशी देणार आहेत का?" अशा अत्यंत अशोभनीय, एकेरी आणि असभ्य भाषेचा वापर करत धमकी दिली. प्रामाणिकपणे राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाचा अशा प्रकारे  अपमान केल्यामुळे शिक्षक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
 या वेळी आप्पाराव इटेकर, विनोद आगलावे, मुरलीधर कडलासकर, संतोष माशाळे,  सचिन चौधरी, अ. गफूर अरब, कोंडीबा जगदाळे, माजिद कलादगी, अन्वर शेख, सोहेल नाईक आदी उपस्थित होते.  
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा:
शिक्षकांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि शिक्षकांना धमकावणाऱ्या सेवक धनसिंग राठोड यांच्यावर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा. जर या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, तर सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages