व्हॉलीबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेचा तिहेरी मुकुट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हरिभाई देवकरण प्रशालेत ९ व १० ऑक्टोबर रोजी आयोजित शहरस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशालेने दिमाखदार कामगिरी करत तिहेरी मुकुट पटकावला. प्रशालेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघासह १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या संघानेही विजेतेपद मिळवून प्रशालेच्या क्रीडा यशात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत तिन्ही संघांनी मेहनत, जिद्द आणि सांघिक खेळाच्या जोरावर विजय संपादन केला. खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाशजी यलगुलवार, जनरल सेक्रेटरी के. डी. पाटील, जनरल सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार, उपाध्यक्ष अनुगीता पवार, सहसचिव सीमा श्रीगोंदेकर आणि मुख्याध्यापक डॉ. हणमंत नारायणकर यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक खंडू शिंदे, क्रीडाशिक्षक सुभाष माने, गणपती कोळी आणि प्रशिक्षक वेदांत तलकोकुल यांनी मार्गदर्शन केले.
विजेत्या संघांतील खेळाडू पुढीलप्रमाणे :
१४ वर्षांखालील मुले : पंकज जवळगिरी, त्र्यंबक आडकी, आर्यन श्रीगांधी, श्लोक मानेकरी, निलेश पेद्दूर, महेश मेरगु, विनय रासकोंडा, तनय अकिरानंदन, आदित्य सुभेदार, निखिल पेद्दूर, सोहम घुगरे आणि आदित्य घुगरे.
१७ वर्षांखालील मुली : प्रांजली शिंदे, श्रावणी कोळी, अमृता परकीपडला, हंसिका गडगी, पवित्रा चिप्पा, ऐश्वर्या सुभेदार, सोनाली पोगुल, उत्कर्षा चौगुले, सृष्टी विटकर, सूर्यादिती गोडसे, नेहा बेशकराव आणि अर्चना राजखडे.
१७ वर्षांखालील मुले : शुभम कोलकुंदी, कार्तिक मानेकरी, रोनक अंद्याल, वीरेन माने, नागराज चारगुंडी, साई भैरी, समर्थ कुडक्याल, विघ्नेश मॅडम, राजेश सरगम, ईश्वर चारगुंडी, नमन वळसे आणि शिव दासरवाड.
स्वामी विवेकानंद प्रशालेच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी उंची मिळाली असून, सर्व स्तरांतून विजेत्या संघांचे अभिनंदन होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment