'हिंदरत्न कामगार पुरस्कार' मीरा शिंदे यांना जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 1, 2026

'हिंदरत्न कामगार पुरस्कार' मीरा शिंदे यांना जाहीर

 'हिंदरत्न कामगार पुरस्कार' मीरा शिंदे यांना जाहीर 





पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):-हिंद कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी कामगार क्षेत्रातील एका व्यक्तीला 'हिंद रत्न कामगार पुरस्कार' देऊन गौरविण्यात येते. यावर्षीचा "हिंद रत्न कामगार पुरस्कार २०२६" पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नूतन भोसरी रुग्णालयातील स्वेच्छा निवृत्त परिचारिका मीरा शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी प्रसिद्धीस दिली आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी (दि. २ सप्टेंबर), सायंकाळी ६ वाजता, हिंद कामगार संघटनेच्या खराळवाडी, पिंपरी येथील कार्यालयात पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी महिला बालकल्याण समितीच्या माजी अध्यक्ष निर्मलाताई सद्गुरु कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम आदी उपस्थित राहणार आहेत. 
    यापूर्वी हिंद रत्न कामगार पुरस्कार जेष्ठ कामगार नेते माधव रोहम, मानव कांबळे, शिवाजी खटकाळे, उत्तम गायकवाड, नंदकुमार सातुर्डेकर, अनिल सोनीकर, किसन येवले, राजेंद्र मोहिते, जगन्नाथ हडप, रोहिदास गायकवाड, नंदू घरत, शेखर देवडेकर, संदीप आयरे, उल्हास पारखे, राजीव राऊत, दिवंगत कैलास खटकाळे या कामगार प्रतिनिधींना देण्यात आला आहे अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages