संभाजी आरमारचा वज्रमुठ मेळावा शुक्रवारी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संभाजी आरमार यांच्या वतीने शुक्रवार, दि. २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता "वज्रमुठ मेळावा" आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सोलापुरातील वोरोनोको प्रशाला मैदान येथे पार पडणार असून कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याच्या माध्यमातून संघटनात्मक ताकद आणि सामाजिक एकजूट दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला असून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मेळाव्यास सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संभाजी आरमारच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment