पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक मा रेखा घनवट मॅडम यांची शिवकमल कॉलेज भंडी शेगाव येथे सदिच्छा भेट.....
रोजी भंडीशेगाव येथील शिवकमल कॉलेज ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सेस या कॉलेजला मा रेखा घनवट मॅडम ,पोलीस निरीक्षक पंढरपूर ग्रामीण ,यांनी सदिच्छा भेट दिली व समाधान व्यक्त केले शिवस्वराज्य मेडिकल फाउंडेशन भंडीशेगाव यां संस्थेच्या वतीने सन 2025 व 2026 पासून भंडीशेगाव येथे डिप्लोमा इन ॲक्युपंक्चर थेरपी या दोन वर्षे कालावधीच्या डिप्लोमा कोर्सचे कॉलेज चालू करण्यात आले आहे सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ॲक्युपंक्चर या शास्त्रामध्ये वैद्यकीय सेवा व्यवसाय करता येणार आहे .यासाठी शासनाने स्वतंत्र महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिल निर्माण केलेले आहे .सदर कोर्स उत्तीर्ण व इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना कायदेशीरपणे शासनाचे परवानगीने विविध आजारावर उपचार , स्वतंत्रपणे वैद्यकीय सेवा, व्यवसाय,करण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाने दिली आहे ,यामध्ये पॅरालिसिस ,संधिवात ,गुडघेदुखी ,कंबर दुखी ,स्पोंडीलाइटिस ,कॅन्सर रुग्णांना केमोथेरपी नंतर होणारे दुष्परिणाम तसेच सर्व आजारांवर उपचार करण्यात येतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ,पंढरपूर तालुक्यातील मौजे भंडीशेगाव येथे सदर अभ्यासक्रमाचे कॉलेज चालू आहे बारावीनंतर कोणतीही शाखा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी प्रवेश घेता येतो प्रवेश घेता येतो .दिनांक 22/ 8 /2026 रोजी पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक मा रेखा घनवट मॅडम यांनी सदर कॉलेजला भेट दिली त्यावेळी त्यांनी ॲक्युपंक्चर शास्त्र व उपचार याविषयी माहिती जाणून घेतली उपस्थित विद्यार्थी व उपचारास आलेले रुग्ण यांच्याशी त्यांनी संवाद साधला व समाधान व्यक्त केले अशा प्रकाराची अशा प्रकारचे उपचार सर्वांना माफक दरात मिळावेत ही अपेक्षा व्यक्त केली ,यावेळी जेष्ठ ॲक्युपंक्चर तज्ञ मा कवठकर सर यांचे मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रमास डॉ.श्रीधर यलमार , वामन यलमार, सौ.प्रीती वामन यलमार, माजी उपसरपंच संतोष ननवरे, संताजी सुरवसे, सुधाकर पवार, बाबासाहेब यलमार, डॉ.किरण पाटील, डॉ.सुधीर शिनगारे, डॉ.सौ जयश्री शिनगारे, डॉ.सौ अमृता कबाडे, डॉ.कु शुभम शिनगारे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment