महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी- तुकाराम मुंढे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी- तुकाराम मुंढे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी- तुकाराम मुंढे



मुंबई (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटण्याच्या कथित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग गठित करण्यात आला आहे. यासंदर्भात व्यक्ती, परीक्षार्थी, विद्यार्थी तसेच संबंधित संस्थांनी आपली निवेदने १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती  दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग गठित करण्यात आला आहे.

आयोगामार्फत औषध निरीक्षक परीक्षा गट-ब, २०२५; महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५; महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, २०२५; महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५; महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, २०२५; महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४; अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा, २०२३; महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५ आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५ या नऊ परीक्षांशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यात येणार आहे.

निवेदनासोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक

यासंदर्भात परीक्षार्थी, विद्यार्थी आणि अन्य व्यक्तींनी आपली निवेदने मराठी किंवा इंग्रजी भाषेत सादर करावीत. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत तसेच कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. निवेदने आणि संबंधित कागदपत्रे आयोगाच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यालयाचा पत्ता: अन्न व औषध प्रशासन भवन, दालन क्र.२०१, दुसरी मजला, बीकेसी वांद्रे, (पूर्व), मुंबई-५१.

तसेच निवेदनाची एक प्रत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठविता येईल.

चौकशी आयोगाकडे प्राप्त झालेली निवेदने, प्रतिज्ञापत्रे आणि संबंधित कागदपत्रे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. निवेदनांची छाननी करून संबंधित व्यक्तीला आयोगासमोर साक्षीदार संदर्भात निर्णय अधिकार आयोगाकडे राहणार असल्याचेही  महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव मुंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages