सोलापूरात ज्योतीताई वाघमारे यांच्या सत्काराचा आज भव्य सोहळा
1001 लाडक्या बहिणींना साडी वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना नेत्या तथा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेल्या प्रा. डॉ. सौ. ज्योतीताई वाघमारे यांच्या सत्कारासाठी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 1001 लायक्या बहिणींना साडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मुळेगाव तांडा, फोर्ड शोरूमच्या पाठीमागे, हैदराबाद रोड, सोलापूर येथे होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन मा. संदीप (आण्णा) राठोड मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा. सिद्धारामजी म्हेत्रे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि अनेक मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात ज्योतीताई वाघमारे यांच्या राज्यसभेवरील निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येणार असून सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी साडी वाटपाचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


No comments:
Post a Comment