संत तुकाराम आणि अंधश्रद्धा निर्मूलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-इ.स. २०१३ हे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे वर्ष. कारण गेली अनेक वर्षे रखडलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा राज्य सरकारने या वर्षी मंजूर करून आपण भारताच्या अन्य राज्याच्या मानाने पुरोगामी आहोत हे सिद्ध केले. म्हणूनच हा कायदा म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संघर्षशील जीवनाला त्याच्या पुरोगामीत्त्वाला जनतेने केलेला सलामच आहे असे मानले पाहिजे. भूतकाळ पाहता महाराष्ट्राला पुरोगामी करण्याचे प्रयत्न अगदी ज्ञानेश्वर, नामदेव यांच्या काळापासून सुरू होते. महानुभाव चक्रधर स्वामींपासून सुरू होते पण ह्या प्रयत्नाला फारसा अर्थ नव्हता. भारतीय मनावर हजारो वर्षांच्या अंधश्रद्धांचा इतका भयंकर पगडा बसलेला आहे की तो एक हजार वर्षानंतरही सामाईक माणसांच्या मेंदूवरून निघालेला नाही. आणि आज कायदा जरी झाला असला तरी अजून पुढील हजारो वर्षे अंधश्रद्धांचे निर्मूलन अवघडच नव्हे तर अशक्यच आहे असे दिसते..
अशा पार्श्वभूमीवर जगद्गुरू तुकोबांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक अभंग साहित्य कशा स्वरूपाचे आहे हे पाहणे आणि त्यावरून संत तुकोबांचे पुरोगामित्त्व अभ्यासणे ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी बाब आहे. चारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संत तुकारामांनी (इ.स. १६०८ ते १६४९) समाज प्रबोधनासाठी खूप कार्य केले. अंधश्रद्धा ह्या प्रामुख्याने देव, धर्म, आत्मा, लोभ, मृत्यू, हानी, रूढी आणि परंपरा किंवा लोकभ्रम यावर आधारलेल्या असतात. देवाला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या. एकादशी, शिवरात्र, नवरात्र, गुरूवार असे उपवास, देवांच्या आवडींची कल्पना करून फुले, पत्रींचे प्रकार, नैवेद्याचे भिन्न पदार्थ, नेसण्याच्या वस्त्रांचे विशिष्ट रंग अशा अनेक अंधश्रद्धा देवकल्पनेवर आधारलेल्या आहेत. काही अंधश्रद्धा धर्मजन्म आहेत, आत्मा अमर असल्याची थाप गीतेत आहे. त्यामुळे पितरपूजेपासून भुताखेतापर्यंतची अद्भूतही पैदा झाली. या साऱ्या अंधश्रद्धा तुकोबांनी त्यांच्या उत्तरायुष्यात नाकारल्या. गाथेत अंधश्रद्धा निर्मूलन करू शकतील असे अनेक अभंग आढळतात. त्यांचा आढावा घेतल्यास उत्तरायुष्यात तुकाराम किती पुरोगामी झाले हे दिसून येईल.
अ) देवकल्पनेचा चुराडा -
एका अभंगात तुकोबा म्हणतात, 'माझे लेखी देव मेला असो त्याला असेल ।।१।। गोष्टी न करी, नाव न घे गेलो दोघे खंडोनी ॥२॥' देवभक्ती करणाऱ्या तुकारामांना ही देवकल्पना किती खोटी आहे हे कळाल्यावर त्यांनी 'देव मेला' असे जाहीर केले आणि त्याचे नाव घेणेही सोडून दिले. या क्र. २३४९ व्या अभंगानंतर त्यांनी अभंग १३ - डॉ. जे.बी. शिंदे शिवस्पर्श दिवाळी' १५ विशेष लेख क्र. ९६१ मध्ये देव मानल्यामुळे आपली कशी फसगत झाली ते सांगितले आहे. अभंग असा, 'आश्चर्य ते एक जाले । मग आले माझिया ॥ मढ्यापाशी करुणा केली । तैसी गेली वृथा हे ।। न यावा तो कैसा राग । खोटे मग देखोनी ?।।' देवकल्पना ही प्रेतरूप आहे. आपण प्रेताकडून काही मागू शकत नाही. मागितले तर प्रेताकडून मिळू शकत नाही. विठ्ठलभक्तीचे खरे स्वरूप तुकोबांना कळाले. वारकरी भक्तांना ही गोष्ट कळाली तर वारी, दिंडी, पालखी, उपवास, टिळे माळा या सर्व अंधश्रद्धेतून त्यांची नक्की सुटका होईल. अभंग क्र. ४२२६ या अभंगाची ओळ डॉ. आ.ह. साळुंखे यांना 'नास्तिकेचा अत्युच्च बिंदू' वाटली. ती ओळ 'आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ।।' अशी आहे. या ओळीतील उत्तरद्धि महत्त्वाचा आहे. देव नाही, नसतो, नसेल हे ठाम प्रतिपादन करून तुकोबा सर्वांना भक्तीचा त्याग करा असे सांगताहेत. आपण त्यांच्या म्हणण्याचा गंभीरपणे विचार केला तर आपली देवकल्पनेच्या जंजाळातून सुटका होईल.
विठ्ठल भक्तीतील व्यर्थपणा ज्या तुकारामांना एवढ्या तीव्रपणे जाणवला ते क्षुद्र देवीदेवतांना कसे मानतील? सेनापती मेल्यावर सैन्याची किंमत शून्य होते तसेच विठ्ठल भक्तीबाबत झाले. विठ्ठल वजा केल्यावर जी गौण देवी दैवते राहतात त्यांना काडीचीही किंमत उरली नाही. तुकोबा २३८४ क्रमांकाच्या अभंगात म्हणतात, 'नव्हे जाखाई जोखाई। मायराणी मेसाबाई | गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ।।' किंवा क्र. ६२१ मध्ये 'शेंदरी ही दैवते। कोण ती पूजी भुतेखेते ? ।।' अशा प्रकारे तुकोबांनी लहानमोठ्या सर्वच देवांना मोडीत काढून फारच मोठा पराक्रम केला आहे. असामान्य लोक ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी पार्वती, दुर्गा अशा देवी- देवांमध्ये गुरफटलेले असतात हे खरे पण सामान्य माणसे मोठ्या आणि क्षूद्र अशा देवांमध्ये अडकून अक्षरशः भिकेला लागलेले असतात म्हणून त्यांना वाचविणे, भक्तीच्या अंधाऱ्या विहिरीतून त्यांना वर काढणे तुकोबांना आवश्यक वाटले म्हणूनच त्यांनी आपल्या अभंगातून लहानमोठे न म्हणता सारेच देव साफ सटकून टाकले. म्हणूनच आज थोर तुकोबा असते तर त्यांनी आमच्या घरातील देव्हारा घराबाहेर फेकून दिला असता, तांब्या पितळेचे देव मोडीत काढले असते, संध्येची पळी-पंचपात्रे, देवपाट, नंदादीप, अभिषेक पात्र सारे सारे घराबाहेर केले असते. जी हिंमत तुकोबांनी दाखविली ती आम्ही का दाखवू शकत नाही ?
ब) तीर्थक्षेत्रांचा निषेध :- तुकोबांनी देवकल्पना जशी पुडकावली तशीच तीर्थक्षेत्रांची महतीही स्पष्ट शब्दात नाकारून आपले पुरोगामित्त्व सिद्ध केले आहे. त्यांचा अभंग क्रमांक १७३२ तीर्थक्षेत्र निषेधाचा आहे. तुकोबा तीर्थक्षेत्रावर प्रेम करणाऱ्याला विचारतात, 'जाऊनिया तीर्था तुवा काय केले ? । चर्म प्रक्षळिले वरी वरी ।। अंतरीचे शुद्ध कासयाने झाले । भूषण त्वा केले आपणया ।।' (अर्थात पवित्र स्थान (?) करून तरी काही साध्य झाले काय? तीर्थ (!) नावाच्या पाण्यात डुबकी मारणाऱ्याची कातडी धुतली गेली पण त्यामुळे मन शुद्ध झाले काय ?) खरे तर मनःशुद्धी, चित्तशुद्धी झाली पाहिजे. तीर्थात स्नान करून केलेली पापे धुवून जात नाहीत. आचरणशुद्धी हाच जीवन पवित्र करण्याचा एकमेव उपाय आहे. ती साध्य करा असे तुकोबा म्हणतात. अभंग क्र. १३७ मध्येही ते अंधश्रद्धेवर प्रहार करताना, 'तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी । काय काशी करिती गंगा । भीतरी चांगा नाही तो ।।' असा प्रश्न विचारतात. तीर्थक्षेत्री देव नसतो, तीर्थ हेही HO असे पाणीच असते. जर तुम्हांला देवाची भेट घ्यायची असेल तर तुम्ही एखाद्या सज्जन व्यक्तीकडे जा. असा माणसातच देवत्व असते. देवमाणसाशी सख्य केल्यावर तीर्थक्षेत्रालाही जाण्याची गरज उरणार नाही हा तुकोबांचा उपदेश वास्तववादी आहे.
0 Comments