बार्शी एम आर संघटनेकडून कडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत
बार्शी, (कटूसत्य वृत्त):- बार्शी वैद्यकीय प्रतिनिधी (एम.आर.)संघटने च्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी चे भान ठेवत आपला एक दिवसाचा पगार देवून ग्रामीण भागातील पूरग्रस्ताना मदत केली. आर्थिक मदतीचा हात दिला.ग्रामीण भागातील लोकांचे मागच्या पंधरा दिवसात झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची शेती घरे पुरामुळे उध्वस्त झाली आहेत. या गोष्टी चा विचार करून बार्शीतील एम आर संघटनेने त्या गरजूंना मदतीचा हात देवून. समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
जमा झालेली रक्कम ही सिरसाव, देवगाव, जवळा आणि लहू या गावातील प्रतिनिधी पांडुरंग देवराम, दिग्विजय मांजरे, बालाजी घाडगे आणि रविराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. त्यांनी या पैशातून गावातील गरजूंना शालेयसाहित्य, धान्य, कपडे आणि औषध या स्वरूपात मदत पोहच केली.
यावेळी बोलताना संघटनेचे युनिट सेक्रेटरी मनोज कुलकर्णी यांनी सांगितले की या अगोदर देखील एमआर संघटनेने अनेक समाज उपयोगी उपक्रम बार्शी शहरांमध्ये घेतले आहेत. यावेळी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments