ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेत जि प शाळांचे सुयश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेत जि प शाळांचे सुयश


 ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेत जि प शाळांचे सुयश



  कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- कसबे तडवळे.येथील कन्या शाळेचा 100 टक्के निकाल तर मुलांची शाळा 75 टक्के निकाल ॠतुजा कोकाटे अव्वल.ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 18 जानेवारी 2026 रोजी झाली होती. देशातील विविध सैनिक स्कूल प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे.गणित, मराठी, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान या चार विषयांचा समावेश प्रश्नपत्रिका मध्ये असतो. यातूनच महाराष्ट्रातील सातारा व चंद्रपूर येथील सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.या परीक्षेचा निकाल 27 फेब्रुवारी 2026 रोजी घोषित झाला. या प्रवेश परीक्षेत कसबे तडवळे जि.प.कन्या शाळेतील 30 विद्यार्थीनी तर जि.प.केंद्रिय शाळेतील 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळेतील 30 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. ऐतिहासिक निकालात पहिल्यांदाच 300 पैकी 275 गुण घेऊन शाळेत अव्वल ठरली ऋतुजा निलेश कोकाटे तसेच संस्कृती सुदाम लोमटे,स्वराली किसन भिसे,ग्रंथाली गणेश करंजकर,राधिका विशाल लंगडे,स्वरा योगेश नलावडे,रौनक बंदेनवाज शेख ,स्वरा संभाजी पाटील,समृद्धी संतोष गावखरे,सायली संदीप खैरे, परिणिती उमेश शिनगारे,पद्मश्री दादा अडसूळ,श्रीनिधी विलास कांबळे,आर्या अतुल जोशी,गिरीजा कृष्णा पाटील,पुनम विनोद वीर,अदिती मनोज माने,आर्वी दत्तात्रय तौर,आनंदी औदुंबर पंडित,आरोही श्रीमंत निकम,श्रावणी सतीश मडके,सई संतोष माने,अनुष्का संतोष आव्हाड,आरोही शिवाजी देशमाने,मीनल सचिन वाघ ,तक्षशिला बंसी कसबे,स्वरांजली गणेश करंजकर,मनश्री श्रीमंत क्षिरसागर,स्वरा गणपती चौरे,प्रियदर्शनी ओमप्रकाश नागटिळक यांनी गुण मिळवले आहेत. तर जिल्हा परिषद आदर्श केंद्रिय प्राथमिक शाळेतील 12 पैकी 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये सक्षम आप्पाराव शिंदे,रूदकांत रजनीकांत बेद्रे,अर्णव आनंद करंजकर, समर्थ गणेश करंजकर,आरव प्रमोद शिंदे,ज्ञानराज ज्ञानदेव जमाले,श्रीनय राजकुमार वाघमारे,वेदांत प्रमोद जमाले,युवराज महेश जमाले,पृथ्वीराज प्रदीप डोके,आरूष सिद्धेश्वर सुरवसे,जिशान वलीक मुलानी गुण घेतले आहेत.कन्या शाळेतील मुलींना धायगुडे जगन्नाथ,तनमोर पांडुरंग ,संजय देशटवाड, पुरी शहाजी,मते क्रांती, कोळी अंबिका ,वरुडकर उषा,ढवळे रामकृष्ण, पवार ऋषिकेश यांचे मार्गदर्शन लाभले.तर केंद्रीय शाळेतील मुलांना बाळासाहेब जमाले,शर्मिला जमाले,हेमलता चांडगे ,शरयू पवार यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे धाराशिव जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष,शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे,गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद,विस्ताराधिकारी किशोरी जोशी,केंद्रप्रमुख जगदीश जाकते,केंद्रिय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय पवार,कन्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद जमाले, केंद्रिय मुख्याध्यापक केशव पवार, कन्या शाळा मुख्याध्यापक रहिमान सय्यद, मोहम्मद नदाफ यांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages