अंकोलीतील गणेश मंदिराच्या विकासासाठी आमदार फंडातून निधी देण्याचा आमदार राजाभाऊ खरे यांनी दिला शब्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 24, 2026

अंकोलीतील गणेश मंदिराच्या विकासासाठी आमदार फंडातून निधी देण्याचा आमदार राजाभाऊ खरे यांनी दिला शब्द

 अंकोलीतील गणेश मंदिराच्या विकासासाठी आमदार फंडातून निधी देण्याचा आमदार राजाभाऊ खरे यांनी दिला शब्द





अंकोली(कटूसत्य वृत्त):-  येथील नवसाला पावणाऱ्या व मानाच्या न्यू गणेश तरुण मंडळाच्या गणपतीची आरती नुकतीच विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
यावेळी आमदार राजाभाऊ खरे यांनी अंकोली येथील गणेश मंदिराच्या शिखर व गाभाऱ्याच्या कामासाठी ₹१ लाख ११ हजार रुपयांची देणगी स्वखर्चातून देण्याचं जाहीर केलं. तसेच न्यू गणेश तरुण मंडळासाठी २५ लेझीम देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मंदिर परिसराच्या विकासासाठी पेव्हर ब्लॉक बसविण्याकरिता आमदार निधीतून ₹१० लाख रुपये उपलब्ध करून देण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला. आमदार राजाभाऊ खरे यांच्या या घोषणेमुळे अंकोलीतील गणेश मंदिराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, मंदिर परिसर अधिक सुशोभित होण्यास मदत होणार आहे. तसेच युवकांच्या व महिलांच्या सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार आहे.
यावेळी अंकोली गावचे उपसरपंच अजिंक्य क्षीरसागर, आण्णासाहेब साळुंखे,मंडळाचे माजी अध्यक्ष रविंद्र पवार, भारत पवार, रणजीत सज्जन पवार, राजशेखर शिंदे, सुधाकर सरवळे, सागर पवार, धनाजी शिंदे, प्रकाश अडसूळ,आबासाहेब कुचेकर, आण्णा गायकवाड, मुन्ना पाटील, प्रमोद गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यू गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष आदित्य पाटेकर यांच्यासह रोहित माळी, शुभम शिंदे,अविनाश रणदिवे, प्रशांत पवार, सुजल सरवळे, स्वामी अडसूळ, दत्तात्रय इंगळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
आरतीनंतर उपस्थित मंडळाचे पदाधिकारी व भाविकांनी आमदार राजाभाऊ खरे यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages