पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जागतिक अंडी दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात १० ऑक्टोंबर हा दिवस पशुसंवर्धन विभागाच्या सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर च्यावतीने “जागतिक अंडी दिन" म्हणून अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेहरू नगर, सोलापूर तसेच बापुजी प्राथमिक शाळा, लष्कर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. १० आणि सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर येथील प्रशिक्षणार्थ्याना उकडलेली अंडी वाटप करून साजरा करण्यात आला.
त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मानवी आहारात अंड्याचे पोषणमूल्य व त्याचे महत्व विषद करून जिल्हा परिषद शाळा/अंगणवाडी/ राज्य राखीव पोलीस दल शाळा येथील विद्यार्थ्यांना व या संस्थेच्या कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्याना साधारणपणे १००० उकडलेली अंडी वाटप करून जागतिक अंडी दिन साजरा करण्यात आला.
जागतिक अंडी दिनाच्या कार्यक्रमासाठी सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर या संस्थेचे प्रमुख डॉ. स्नेहंका बोधनकर, पशुधन विकास अधिकारी गट- अ यांनी दैनंदिन आहारामध्ये अंड्याच्या पोषणतत्वांची माहिती विस्तृतपणे माहिती दिली. तसेच दैनंदिन जीवनातील आहारामध्ये अंड्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग करून शालेय विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी आपले आरोग्यरक्षण करणे आवश्यक आहे असे विषद केले. तसेच डॉ. भोसले शिवाजी, खाजगी पोल्ट्री सल्लागार, सोलापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी जागतिक अंडी दिनानिमित्त दैनंदिन अंडी खाण्यात आल्याने कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करता येते. तसेच अंडी हे भेसळमुक्त असून शाकाहारी असल्याचे सांगितले.
जागतिक अंडी दिनाच्या निमित्ताने प्रसाद कृष्णाजी भगत, भैरवनाथ हायटेक अग्रो प्रा. लि. मुस्ती (पिंजारवाडी) ता. द. सोलापूर आणि वेकंटराव, बालाजी पोल्ट्री फार्म, बाणेगाव ता. उ. सोलापूर जि. सोलापूर यांनी पशुसंवर्धन विभागास अंडीचे प्रयोजन/उपलब्धी करून दिली.
यावेळी डॉ. स्नेहंका बोधनकर व डॉ. भोसले शिवाजी, बालाजी फार्म्स सोलापूर यांनी अंडीचे महत्व विषद करून मानवी आहारात अंडी खाण्याचे जनतेस आवाहन केले. तसेच सदर कार्यक्रमासाठी थोरबोले, मुख्याध्यापक, जि.प. प्रा. शाळा, नेहरू नगर, सो. श्रीमती ज्ञानेश्वरी संगीतकर, मुख्याध्यापक, बापुजी प्राथमिक शाळा, लष्कर, सो. तसेच पुंडलिक कलखांबकर, मुख्याध्यापक, जि.प.प्रा. शाळा,राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. १० सोरेगाव व सर्व त्यांचे शिक्षकवृंद्ध व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहकार्य केलेले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सघन कुक्कुट विकास गट, सोलापूर येथील डॉ. स्नेहंका बोधनकर, पशुधन विकास अधिकारी गट- अ, एस. पी. माने, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तसेच परिचर दिनानाथ जमादार, संताजी देशमुख व प्रशांत निकंबे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments