सोलापूर सद्भावना मंच स्थापना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-6 ऑक्टोंबर 2023 ला सोलापूर मध्ये शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांची एक मिटिंग जमाते इस्लामीच्या कार्यालयात संपन्न झाली. ही मिटिंग सोलापूर मध्ये सद्भावना मंचची स्थापना करण्यासाठी बोलविण्यात आली होती. देशात सध्या ज्याप्रकारचे विव्देषाचे, जातियतेचे भेदभावाचे, हिंसाचाराचे वातावरण निर्माण केले गेले आहे आणि दिवसेंदिवस सामाजिक वातावरण गढूळ होत आहे. देशातील मूठभर लोक सामाजिक सलोखा, शांतता बिघडविण्याचे काम करीत आहेत. याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. हाच हेतू घेऊन सोलापुरात सद्भावना मंच ची स्थापना करण्यात आली. या कार्यात शहरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, संत रोहिदास मंच, समविचारी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी विविध वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि मंचची स्थापना करण्यास अनुकुलता दर्शविली. कार्यक्रमाची सुरवात अ करीम साहेबांनी कुरआन पठणाने केली. ही मिटिंग प्रसिध्द वक्ते, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ सय्यद रफिक पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली. तद नंतर शफिक काजी साहेबांनी प्रास्तविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी समाजाची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाय म्हणजेच सद्भावाना मंच आवश्यकता यावर आपले विचार मांडले.
त्यानंतर आदरणीय अशोक आगवणे साहेब ( संत रोहीदास विचारमंच), आदरणीय शंकरराव लिंगे ( अध्यक्ष, अखिल भारतीय माळी समाज), समिउल्ला शेख ( समविचार संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते), आदरणीय शाम कदम ( संभाजी ब्रिगेड), अश्फाक शेख, डॉ रफिक सय्यद ( चेअरमन मकबुल ए आम ट्रस्ट) अड. सैफन शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मंच स्थापनेस पाठींबा दर्शविला. सर्वानुमते खालील पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष अशोक आगवणे साहेब उपाध्यक्ष समिउल्ला शेख उपाध्यक्ष युवराज शेळके सेक्रेटरी- शफिक काजी आपल्या मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणात डॉ रफिक सय्यद साहेबांनी सामाजिक स्थिती, देशात पसरलेली अशांतता, भेदभाव, जातियता यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. देशात सामाजिक सलोख्याची गरज आणि तो कसा निर्माण केला जाऊ शकतो हे त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत, कुरआनाचे आदेश, पैगंबरांची शिकवण, संत तुकाराम, संत कबीर, तुकडोजी महाराज यांचेअभंग सर्वासमोर ठेवले. विविध उदाहरणे देऊन सामाजिक सलोखा कसा निर्माण केला जाऊ शकतो, हे सांगितले. सद्भावना मंचची आवश्यकता किती गरजेची आहे हे पटवून दिले. मंचच्या स्थापनेस त्यांनी शुभेच्छ्या दिल्या आणि विश्वास व्यक्त केला की भविष्यात शहरात सामाजिक सलोखा आणि शांतता निर्माण करण्यात मंचचे मोठे योगदान असेल या कार्यक्रमात डॉ इस्माईल शेख ( अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद सोलापूर) हारून शेख, जमीर कुडले, अ मजीद शेख, उजैर रंगरेज, साकिब बागवान, मौ अ रहीम, SIO चे तरुण कार्यकर्ते आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. अ करीम साहेबांनी सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले.
0 Comments