महिला सक्षमीकरण आणि लिंग-संवेदनशील शहरी प्रशासन विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Housing and Urban Affairs – MoHUA, Government of India) यांच्या पूर्ण सहकार्याने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट (AIILSG), मुंबई अंतर्गत रीजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीज (RCUES) यांच्या वतीने व सोलापूर महानगरपालिका महिला बालकल्याण विभाग यांच्या सहकार्याने महिला सक्षमीकरण, लिंग-संवेदनशील शासन (Gender Responsive Governance) आणि शाश्वत विकासाच्या संदर्भातील प्रादेशिक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रशिक्षण कार्यक्रम हॉटेल निसर्ग रामलाल चौक सोलापूर येथे सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 पर्यंत आयोजित करण्यात आला होता..
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती सौ. रंजिता चाकोते, नवनिर्वाचित सर्व महिला नगरसेविका, सहाय्यक आयुक्त मनिषा मगर, RCUES, AIILSG चे संचालक डॉ. अजित साळवी तसेच RCUES, AIILSG च्या कनिष्ठ संशोधन अधिकारी कु. यशश्री डी. राणे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अजित साळवी यांनी उद्घाटनपर भाषण करताना शहरी प्रशासनामध्ये महिलांचा सहभाग आणि नेतृत्व वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लिंग-संवेदनशील दृष्टीकोनातून नियोजन आणि अंमलबजावणी केल्यास शहरी विकास अधिक समावेशक आणि परिणामकारक होऊ शकतो असे सांगितले.
यानंतर उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी प्रमुख भाषण (Keynote Address) देताना महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरण हे शाश्वत शहरी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. महिलांसाठी सुरक्षित, समावेशक आणि सशक्त शहर निर्माण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी लिंग-संवेदनशील धोरणे आणि कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
तसेच स्थायी समिती सभापती सौ. रंजिता चाकोते यांनी विशेष मार्गदर्शन (Special Address) करताना स्थानिक प्रशासनामध्ये महिलांची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशिक्षण, क्षमता विकास आणि सामुदायिक सहभाग यांचे महत्त्व स्पष्ट केले.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये लिंग-संवेदनशील शासन (Gender Responsive Governance), जेंडर बजेटिंग (Gender Budgeting), महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वयं-सहाय्यता गटांची (Self Help Groups – SHGs) भूमिका, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात विविध ग्रुप अँक्टिव्हिटी घेण्यात आल्या...
तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व, समुदायाचा सहभाग, आणि महिलांच्या नेतृत्वातून शहरांच्या विकास प्रक्रियेला गती देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सोलापूर तसेच परिसरातील महानगरपालिका अधिकारी, नवनिर्वाचित सर्व महिला नगरसेविका, स्वयंसेवी संस्था, स्वयं-सहाय्यता गटांचे प्रतिनिधी आणि विविध विभागांतील अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाद्वारे सहभागींस शहरी प्रशासनामध्ये महिलांची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षणार्थी महिला नगरसेविका व अधिकाऱ्यांना AILSG कडून प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आले..SDGS प्रशिक्षण घेतलेल्या महिला नगरसेविका व लोकप्रतिनिधी पुढीलप्रमाणे.. आरती वाकसे ,वनिता पाटील ,अश्विनी चव्हाण ,सुमन चाबुकस्वार
,वैशाली भोपाळे ,संगीता जाधव , वहिदा बानो शेख ,रोहिणी तडवळकर ,श्रीकांचना यन्नम ,राजश्री दोडमणी, कविता गज्जम ,कलावती गाडगे , संगीता जाधव ,मंजिरी किल्लेदार , गीता गवई ,बबिता धुम्मा , पूजा वाडेकर ,उज्ज्वला दासरी ,दीपिका यलदंडी , सारिका काजूरगे ,स्वाती बडगु ,वंदना गायकवाड ,ऐश्वर्या साखरे ,अलका भवर ,मंदाकिनी तोडकरी
,सोनाली गायकवाड ,मृण्मयी गवळी , श्रद्धा पवार , , पूनम काशीद, अर्चना वडनाळ , सुनीता कामाठी , अकिला भागनगरी , श्रीदेवी फुलारे ,विजया खरात ,श्वेता खरात ( खांडेकर) ,कल्पना कदम ,निर्मला जंगम इत्यादी.
कार्यक्रमाचे समन्वयन RCUES, AIILSG च्या कनिष्ठ संशोधन अधिकारी कु. यशश्री राणे व महिला बालकल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment