सभापतिपदी भाजपचे अस्लम चौधरी बिनविरोध; उल्का पाटील उपसभापती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 13, 2026

सभापतिपदी भाजपचे अस्लम चौधरी बिनविरोध; उल्का पाटील उपसभापती

 सभापतिपदी भाजपचे अस्लम चौधरी बिनविरोध; उल्का पाटील उपसभापती

मोहोळ (कटूसत्य वृत्त): मोहोळ तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे अस्लम गफूर चौधरी (घोडेश्वर) यांची तर उपसभापतिपदी उल्का राजकुमार पाटील (नरखेड) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोहोळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाने १२ पैकी ७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा, शिंदे गटाच्या शिवसेनेला १ आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली आहे.

मोहोळ पंचायत समितीचे सभापतिपद मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. या पदासाठी घोडेश्वर गणातील अस्लम चौधरी, सावळेश्वर गणातील पार्वती गावडे आणि कामती गणातील कोमल अवताडे इच्छुक होते. मात्र, बाजार समितीच्या सभागृहात माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अस्लम चौधरी आणि उल्का राजकुमार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

यानंतर दोघांनी निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याने दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली. निवडीनंतर माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

चौकट : मुस्लीम सदस्याला संधी

राज्यात काही भाजप आमदारांनी अलीकडच्या काळात मुस्लीम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्ये केल्याची चर्चा सुरू असतानाच मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती सभापती निवडीत मात्र भाजपने मुस्लीम उमेदवार अस्लम चौधरी यांना संधी दिली आहे. त्यामुळे या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages