29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंचे अंतरवालीतच उपोषण
प्रश्न सुटला नाही तर मुंबईला जाणार
अंतरवाली सराटी (कटूसत्य वृत्त):- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्टपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
दरम्यान, ते उपोषण अंतरवाली सराटीत करणार की मंबईत करणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, अखेर मनोज जरांगे पाटील यांनीच याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. उपोषण अंतरवाली सराटीतच होणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे. पण प्रश्न जर निकाली निघाला नाही तर उपोषण सुरु असतानाच मुंबईला निघणार असल्याचा थेट इशारा देखील त्यांनी दिला आहे.
फडणवीस आणि शिंदेमुळचं उपोषणाची वेळ आली
दरम्यान, यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांच्यामुळंच उपोषणाची वेळ आली असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तर संजय सिरसाट यांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार असून दोघांची मिली भगत असल्याची शंका जरांगेंनी व्यक्त केली आहे. दरम्यान, उपोषण अंतरवाली सराटीत होणार असून, प्रश्न निकाली नाही लागला तर मुंबईत येणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
सिरसाट यांनी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण मुंबईत करणार की अंतरवाली सराटीत करणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर मनोज जरांगे पाटील यांनीच उपोषण अंतरवाली सराटीत करणार असल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर सरकारला इशारा देखील दिला आहे. उपोषण अंतरवाली सराटीतच होणार असल्याची माहिती खुद्द जरांगे यांनी दिली आहे. येत्या 29 ऑगस्टला मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणला बसणार आहेत. मात्र हे आंदोलन मुंबई होणार की अंतरवाली सराटी याबाबत संभ्रम होता. मात्र आता मराठा समाजाचं आंदोलन अंतरवाली सराटीतच होणार असून प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरु असतानाच मुंबईला जाणार आहे. त्यासाठी परवानगी अर्ज केला असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळेच उपोषणाची वेळ आली आहे. शिंदे यांच्या सांगण्यावरूनच बैठका घेण्यात आल्याचे जरांगे म्हणाले. एकनाथ शिंदे आणि संजय सिरसाट यांची मिलीभगत असून सिरसाट यांनी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.

No comments:
Post a Comment