सामाजिक हुतात्मा डॉ. नरेंद्र दाभोळकर ज्येष्ठ साहित्यिक -राजेंद्र भोसले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-डॉ. नरेंद्र दाभोळकर, अँड.गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी , गौरी लंकेश हे सामाजिक हुतात्मे होऊन गेले. समाजातील अंधश्रद्धा रोखण्यासाठी या हुतात्म्यानी काम केले. सत्य बोलणं, खरं बोलणं हे कटूसत्य आहे असे भावनिक मनोगत ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले यांनी डॉ. दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनी डॉ. दाभोळकर, अँड . पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे वर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शहर शाखा, सोलापूर यांचे वतीने डॉ. दाभोळकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 ला झाली, त्यास 13 वर्षे झाली त्या निमित्ताने डॉ. दाभोळकर यांना अभिवादन करण्यासाठी आणि पुस्तक लोकार्पण सोहळा करण्यासाठी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळास्थळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शहर शाखा, सोलापूरचे समितीचे सर्व कार्यकर्ते जमले होते. प्रथम डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले. डॉ. दाभोळकर यांचे वर अभिवादन गीत डॉ. अस्मिता बालगावकर आणि सर्वांनी सामूहिक म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष आर. डी. गायकवाड यांनी, पाहुण्यांचा परिचय ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी, तर आभार सुजित हावळे यांनी मानले. या कार्यक्रमास सुजित हावळे, अण्णा दीक्षित, रामलिंग गायकवाड, विठ्ठल गायकवाड, कुंडलिक मोरे, ब्रह्मानंद धडके, दीपक पांडगळे, निशा भोसले, डॉ.अस्मिता बालगावकर, सुनीता गायकवाड, छाया मोरे, शकुंतला सूर्यवंशी, अरुण गायकवाड, मिलिंद ताकपेरे, सुनील डांगे इत्यादी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment