आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा- कपिल सिब्बल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 20, 2026

आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा- कपिल सिब्बल

 आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा- कपिल सिब्बल


नवी दिल्ली (वृत्त सेवा):- देशाचं लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्यावतीने वकील कपिल सिब्बल प्रभावी बाजू मांडत आहेत.

आत्तापर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंनाच दिले पाहिजे, अशी मागणी सिब्बल न्यायालयात करत होते. मात्र, पहिल्यांदाच कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कपिल सिब्बल यांनी यापूर्वीही आपले मुद्दे प्रभावीपणे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर मांडले असून विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळा असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. त्यामुळे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अनेकदा व्यक्त केला आहे. तर, एकतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल किंवा ते गोठवलं जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. आता, ठाकरेंचे वकिल कपिल सिब्बल यांनी मोठी मागणी करत चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

तर पक्ष आणि चिन्ह गोठवावे - सिब्बल

माझा विचारपूर्वक मांडलेला युक्तिवाद असा आहे आणि मी माननीय न्यायालयाला विनंती करतो की, 'शिवसेना' हे नाव ठाकरे यांचेच आहे आणि शिंदे गटाला ते चिन्ह मिळू शकत नाही, असा निर्णय द्यावा. त्यांनी त्या चिन्हाचा लाभ घेतला आहे, याचा अर्थ त्यांच्या बाजूने कोणताही न्याय्य हक्क निर्माण होत नाही. हा चिन्हाचा अनधिकृत वापर करण्याचा प्रकार आहे. जर ते चिन्ह त्यांना मिळू शकत नसेल आणि मलाही मिळू शकत नसेल, तर ते चिन्ह गोठवले गेले पाहिजे. कारण, ते नाव माझा हक्क आहे, अशा शब्दात कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पहिल्यांदाच मोठी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages