Hot Posts

6/recent/ticker-posts

जयहिंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश

 जयहिंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश




  कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):-  धाराशिव जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये 19 वर्ष वयोगटात उंच उडी (High jump) या स्पर्धेमध्ये इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या स्वप्निल धनाजी तोडकर यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या बांबु उडी या स्पर्धेमध्ये प्रगती रामचंद्र पवार यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला
    यापूर्वी झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 17 वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत 60 किलो खालील वजन गटात आदित्य बाबासाहेब मिसाळ यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर 0 ते 40 किलो मधील वजनगटात मुलींच्या स्पर्धेत स्वराली सौदागर होगले यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
  19 वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 0 - 48 किलो वजन गटात अर्जुन अनिल कळवंडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर
 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या 0 - 48 किलो वजन गटातील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये लक्ष्मी आश्रम इंगळे यांनी प्रतिस्पर्ध्यांशी झुंज देत प्रथम क्रमांक मिळवला.
       नांदेड जिल्ह्यामध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अनुज तानाजी तोडकर यांनी 0 ते 48 किलो वजन गटात सहभाग नोंदवला.
       धाराशिव जिल्हास्तरीय विविध स्पर्धेतून लातूर विभागीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पि.टी. पाटील खजिनदार बापू शितोळे जॉईंट सेक्रेटरी अरुण देबुडवार स्कूल कमिटीचे चेअरमन टी. पी. शिनगारे व विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील एस. एस. तसेच प्राध्यापक,प्राध्यापिका शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी क. तडवळे चे सरपंच ,उपसरपंच व ग्रामस्थ यांनी देखील यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक पठाण आय .एल. याचे अभिनंदन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments