पांगरीत सोपल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रंगला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 5, 2026

पांगरीत सोपल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रंगला

 पांगरीत सोपल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रंगला




बार्शी (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील पांगरी येथील स्व. शोभाताई सोपल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांगरीच्या कन्या तथा सपोनि जरीना बागवान या होत्या. विलेपार्ले (मुंबई) येथे कार्यरत न्यायाधीश प्रमोदिनी मुळे-टेकाळे, पत्रकार गणेश गोडसे, बाबा शिंदे, आसिफ मुलाणी, शंकर लाखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्रीराम जाधवर, अण्णा डोके, राजकुमार शिंदे, संतोष खवले, राहुल बगाडे, राम बसाटे, प्रशांत मुंडे, असीम शेख, भारत काळे, गणेश चौधरी, ‘सरपंच दि पावर’ चित्रपटाचे अभिनेते महादेव जाधवर, संगीतकार भूषण देवकर तसेच संस्थेचे संस्थापक विनायक गरड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्यस्तरीय शालेय आस्टेंडू आखाडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी पलक राजेंद्र वाघे तसेच तृतीय क्रमांक मिळवणारा समर्थ बिभीषण सांगळे यांचा प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात संस्थापक विनायक गरड यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला. न्यायाधीश प्रमोदिनी मुळे-टेकाळे यांनी ग्रामीण भागात उत्कृष्ट शिक्षणाचा पाया उभारण्यासाठी विनायक गरड यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. पत्रकार गणेश गोडसे यांनी शोभाताई सोपल स्कॉलरशिप या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री विघ्नहर्त्याच्या वंदनेने ‘या रे या सारे या गणेशाच्या’ या गीताने झाली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कोळी नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील सादरीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षलागवड यांसारख्या विषयांवरील कार्यक्रम तसेच छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित नाटक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी समृद्धी कारंडे, पलक वाघे, भारती चौधरी व गौरी चौधरी यांनी केले, तर मुख्याध्यापिका चांदणे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages