वैराग येथील कोरके आश्रमशाळेत पारंपरिक पद्धतीने होळी
वैराग (कटूसत्य वृत्त):- वैराग येथील शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके संचलित इंदिरानगर आश्रमशाळेत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विकास पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जय जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पालापाचोळा व लाकडे गोळा करून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच हिंदू सण-परंपरांची ओळख व माहिती मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य खंडेराया घोडके यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब वाळके यांनी केले, तर चंद्रकांत घायतिडक यांनी आभार मानले.
.png)
No comments:
Post a Comment