महसूल पथकावर हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोल्यात कामबंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 5, 2026

महसूल पथकावर हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोल्यात कामबंद

 महसूल पथकावर हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोल्यात कामबंद    

                               


सांगोला (कटूसत्य वृत्त): कोरडा नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर तसेच शासकीय वाहनावर दगडफेक करून हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ सांगोल्यात महसूल कर्मचारी संघटनांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, सोलापूर तसेच सांगोला ग्राम महसूल अधिकारी संघ, सांगोला तालुका महसूल कर्मचारी व महसूल सेवक संघटनांच्या वतीने तहसीलदार बाळूताई भागवत यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे हल्ला प्रकरणातील आरोपी अतुल गावडे व पप्पू बिचकुले यांच्यासह इतर आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, महसूल कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे सांगोला तहसील कार्यालयासह पुरवठा शाखा, निवडणूक शाखा, सांगोला तलाठी कार्यालय तसेच ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयांमध्ये कामकाज ठप्प झाले होते.
जोपर्यंत या गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष हरिश जाधव यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages