बार्शी आय.एम.ए. कडून पूरग्रस्तांना २ लाख ५१ हजाराची मदत
बार्शी, (कटूसत्य वृत्त):- इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), बार्शी शाखेने सामाजिक उत्तरदायित्व जपत बार्शी तालुका तसेच परिसरातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी रु. २,५१,०००/- (अक्षरी रुपये दोन लाख एकावन्न हजार) इतकी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस अर्पण केली.
सदर चां धनादेश बार्शीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी डॉ. बी वाय यादव,डॉ. प्रशांत मोहीरे,बार्शी आय एम ए चे अध्यक्ष डॉ. सुधीर बकरे, उपाध्यक्ष डॉ. मौलाना शेख,डॉ. कैवल्य गायकवाड ,डॉ. सौ. सुनीता देशमुख,डॉ. संजय अंधारे,डॉ. निनाद दोशी, प्रमोद सावंत,डॉ. विलास देशमुख हे उपस्थित होते.
यावेळी बार्शीचे तहसीलदार शेख यांनी आय एम ए च्या या अर्थसहाय्याचे कौतुक केले. यावेळी डॉ.सुधीर बकरे,डॉ.संजय अंधारे,डॉ. कैवल्य गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी आयएमए बार्शी शाखेकडून एक नविन योजना जाहीर करण्यात आली,याअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कमी दरात आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहे.
0 Comments