टेंभुर्णी–पंढरपूर रोडवर कारची दुचाकीला धडक; एक ठार, दोघे जखमी
पंढरपूर–टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-मार्गावर परीते गावच्या शिवारातील सरकारी दवाखान्याजवळ 28 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10.15 वाजता भरधाव कारने दुचाकीला समोरून धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली.
या प्रकरणी फिर्यादी दयानंद सुरेश पानसरे (वय 33, रा. लव्हे ता. माढा, सध्या मार्स हॉस्पिटल टेंभुर्णी) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी लक्ष्मण बंकट कळसाईत (रा. झरे ता. करमाळा) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
घटनेतील माहिती अशी की, फिर्यादी दयानंद पानसरे हे अमोल भाऊराव देशमुख (वय 35) व आण्णासाहेब संभू लुंगसे (वय 42, रा. मुंगसे बस्ती, लव्हे ता. माढा) यांच्यासह मोटारसायकल (क्र. एमएच 45 एल 8720) वरून पंढरपूरहून टेंभुर्णीकडे येत होते. परीते गावच्या शिवारात सरकारी दवाखान्याजवळ आले असता समोरून येणारी कार (क्र. एमएच 45 ए क्यू 0270) चालकाने हयगयीने, अविचाराने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात फिर्यादी व अमोल देशमुख हे किरकोळ जखमी झाले असून आण्णासाहेब लुंगसे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. अपघातात मोटारसायकलचे सुमारे 20 हजार रुपये तर कारचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा क्रमांक 114/2026 भा. न्या. सं. 2023 चे कलम 281, 125(अ), 106(1), 324(4) सह मोटार वाहन अधिनियम सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गणेश जगताप हे करीत आहेत.


No comments:
Post a Comment