सोलापूर लेडीज टेलर असोशिएशनच्यावतीने जागतिक टेलर दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
सोलापूर लेडिज टेलर असोसिएशनच्यावतीने जागतिक टेलर दिनानिमित्त सोलापूरातील जुन्या काळातील या क्षेत्रात असणाऱ्या व उत्कृष्ट कामगारांचा सत्कार करून टेलर दिन साजरा करण्यात आला.
सोलापूर लेडिज टेलर असोसिएशनच्यावतीने जागतिक टेलर दिनानिमित्त दत्त नगर येथील दत्त मंदिर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक सतिश सिरसिल्ला, अविनाश दासरी, उद्योगपती अमर पवार, उद्योगपती लक्ष्मीकांत चाटला, ॲंड. प्रियांका गोरंटी, अध्यक्ष नरेश कोलप्याक, उपाध्यक्ष विनायक जिंदम, सचिव पुंडलिक पगडीमल यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सोलापूरमध्ये लेडिज टेलर नावलौकिक मिळविलेले सुदर्शन गोगा, मधुसुदन येलदेटी, दतात्रय बंडी, राजु कामुती, नागनाथ साका, पुंडलिक पगडीमल, नागेश मंडल, राजेंद्र गुतीकोंडा, विनायक लोखंडे, नरेश मंडप आदीचा सत्कार करण्यात आला. आपल्या कुशल हातानी समाजाला सौदर्य, आत्मविश्वास आणि ओळख देण्याचे कार्य करणारे म्हणून मान्यवरांना प्रतिक्रिया दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरूण म्याकम, सुंदरम म्याकल, अशोक बाहेती, उदयन इरकुला, गोपी तुम्मा, राजू कामुर्ती, लक्ष्मीकांत देवतराज, अमरिष पुकाळे, नरेश गडगी आदीनी परिश्रम घेतले.
फोटो आहे.

No comments:
Post a Comment