संयोजन समितीची माहिती, प्रबोधनपर्वाचे दुसरे पुष्प - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

संयोजन समितीची माहिती, प्रबोधनपर्वाचे दुसरे पुष्प

 संयोजन समितीची माहिती, प्रबोधनपर्वाचे दुसरे पुष्प




सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त प्रबोधनपर्व उपक्रमात ९ ऑगस्ट रोजी प्रा. डॉ. उमेश बगाडे यांचे व्याख्यान होणार आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय महात्मा फुले आणि त्यांची सत्ता संकल्पना आहे. 

हा कार्यक्रम डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. रा. गो. म्हेत्रस असतील, अशी माहिती म. फुले जन्म द्विशताब्दी समितीने येथे दिली.

प्रा. बगाडे इतिहासाचे अभ्यासक असून आधुनिक काळातील महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे भाष्यकार आहेत. त्यांची महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा आणि जात-वर्गाचे वर्चस्व, तसेच म. जोतीराव फुले ही पुस्तके गाजली आहेत. सामाजिक सुधारणा व जातिव्यवस्था या विषयांवरील त्यांनी विपुल लेखन केले आहे. तसेच राज्याच्या विविध भागात त्यांनी व्याख्याने दिली आहेत.

यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य नरेश बदनोरे, उपाध्यक्ष प्रा. एम. आर. कांबळे, लक्ष्मीदास सोनकवडे, कार्याध्यक्ष शंकर पाटील, कोषाध्यक्ष अॅड. गोविंद पाटील, सचिव अॅड. मनीष गडदे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. सोलापूरकरांनी प्रबोधनाच्या या जागरात सामील व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

समितीतर्फे वर्षभर उपक्रम
समितीच्या वतीने म. फुले यांच्या जन्म द्विशताब्दी निमित्ताने वर्षभर कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वात दर महिन्याला एक व्याख्यान होणार आहे. या प्रबोधनपर्वाचे उद्-घाटन ७ जुलै रोजी प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या हस्ते झाले होते. तसेच त्यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्पही गुंफले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages