बालरंगभूमी व परिषदेच्या वतीने विविध शाळांमध्ये लोककलेची कार्यशाळा उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 17, 2026

बालरंगभूमी व परिषदेच्या वतीने विविध शाळांमध्ये लोककलेची कार्यशाळा उत्साहात संपन्न

 बालरंगभूमी व परिषदेच्या वतीने विविध शाळांमध्ये लोककलेची कार्यशाळा उत्साहात संपन्न 





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बालरंगभूमी परिषद सोलापूर शाखेच्या वतीने दि.23 व दि.24 सप्टेंबर 2026 रोजी जल्लोष लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे...

या महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील लोककलेची माहिती, प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त हेतूने शहरातील काही निवडक शाळांमध्ये लोककलेच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते...

 या अंतर्गत स्वामी विवेकानंद प्रशाला.(जुळे सोलापूर), व्ही.एम. मेहता प्रशाला व एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल व छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळांमध्ये कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले...

 यावेळी विद्यार्थ्यांना संगीत दिग्दर्शक मा.प्रा.प्रशांत देशपांडे व लोककला महोत्सवाचे समिती प्रमुख मा.सुभाष माने यांनी प्रोजेक्टरच्या साह्याने आपल्या महाराष्ट्रातील विविध लोककलांची माहिती दिली व प्रात्यक्षिकेही दाखवली...

 या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला...

 प्रत्येक शाळेमध्ये लोककलेची माहिती विद्यार्थ्यांनी आनंदाने ग्रहण केली व येणाऱ्या लोककला महोत्सवामध्ये सहभागी होणार असल्याचेही सांगितले...

 यावेळी स्वामी विवेकानंद प्रशालेचे मुख्याध्यापक मा.शिवाजी काशीद , व्ही.एम. मेहता प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.श्रुती बागेवाडी एस.पी.एम.इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मा.संगीता कोळी व छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मा.सुजाता जुगदार , उपमुख्याध्यापक मा.श्रीपादराव जगदाळे हे उपस्थित होते...

 दि.23 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता पद्माकर देव सभागृह, नाट्य परिषदेचे कार्यालय, मोदी येथे संपन्न होणाऱ्या एकल गायन, एकल वादन, एकल नृत्य व समूह गायन या स्पर्धेमध्ये

 तसेच दि.24 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वा. अँम्फी थिएटर, हिराचंद नेमचंद वाचनालय, पार्क चौक सोलापूर येथे होणाऱ्या समूह नृत्य व पारितोषिक वितरण समारंभास सर्व बालकलाकारांनी सहभाग नोंदवावा व उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्ष मा.सौ.सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी केले...

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages