सहकार महर्षी साखर कारखान्याचा ६५ वा बॉयलर प्रदिपन समारंभ संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 17, 2026

सहकार महर्षी साखर कारखान्याचा ६५ वा बॉयलर प्रदिपन समारंभ संपन्न

 सहकार महर्षी साखर कारखान्याचा ६५ वा बॉयलर प्रदिपन समारंभ संपन्न



        

अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि.,
शंकरनगर-अकलुज या कारखान्याचा ६५ वा बॉयलर प्रदीपन समारंभ कारखान्याच्या संचालिका कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला. 
        सदर कार्यक्रमास कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील,सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील, नगरसेवक अकलुज नगरपरिषद, कारखान्याचे आजी व माजी संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी गळीत हंगामाच्या दृष्टीने कारखान्याचा आढावा घेऊन पाऊसाची परिस्थिती, पाण्याची कमतरता, साखरेच्या एम.एस.पी. मध्ये वाढ करणे अत्यंत गरजेचे असून त्याबाबत सरकारला विनंती केली असून नीरा उजवा कालव्यास समांतर पाईप लाईन करणेबाबत  केंद्र सरकारच्या माध्यमातून सदर प्रकल्पास गती देण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना विनंती केली.
        गाळप हंगाम २०२५-२०२६ करीता कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑफ शुगर फॅक्टरी लि.नवी दिल्ली या देशपातळीवरील संस्थेकडून राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार अंतर्गत सर्वोकृष्ट सहकारी साखर कारखाना ऊस विकास उच्च उतारा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला असून, सभासद कामगार व व्यवस्थापनाचे अभिनंदन करुन कौतुक केले.
       श्री सत्यानारायण महापुजा संचालक विराज प्रकाश निंबाळकर व त्याच्या सुविद्य पत्नी विशाखा विराज निंबाळकर या उभयतांचे हस्ते संपन्न झाली.
         या गळीत हंगामासाठी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास द्यावा असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages