आयुष्यमान भारत मिशनच्या महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांची आरोग्य विद्यापीठास भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

आयुष्यमान भारत मिशनच्या महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांची आरोग्य विद्यापीठास भेट

 आयुष्यमान भारत मिशनच्या महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांची आरोग्य विद्यापीठास भेट





नाशिक (कटूसत्य वृत्त):- आयुष्यमान भारत मिशनच्या महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी आयुष्यमान भारत मिशनच्या महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी संागितले की, शासनाची एकत्रित आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी अत्यंत उपयोगी आहे. विद्यापीठाच्या ज्या संलग्नित महाविद्यालयांनी या योजनेचा प्रभावी पध्दतीने प्रसार करुन जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता येईल याकडे अधिक व्यापकरित्या कार्य केले जाईल. आयुष्यमान भारत मिशनव्दारा लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी संागितले.
यावेळी विद्यापीठोच मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी संागितले की, विद्यापीठाच्या विविध उपक्रमांव्दारे आरोग्य विषयक जनजागृती व आयुष्यमान भारत मिशनचा मोठया प्रमाणात प्रचार करण्यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
या भेटीप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक     डॉ. सतिष शिंपी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुर्यवंषी, ज्येष्ठ पत्रकार श्री. महेंद्र महाजन आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages