अभियंता दिनानिमित्त सोलापूर विकास मंचाचा विकासाचा संकल्प; सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आता सर्व तांत्रिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचा एकमताने निर्धार*
शासकीय विश्रामगृहात अभियंता दिन उत्साहात साजरा; शहराच्या विकासासाठी तज्ज्ञांच्या सहभागातून ठोस योगदान देण्याचा संकल्प
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-अभियंता दिनानिमित्त आज शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे सोलापूर विकास मंचाच्या वतीने अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील अभियंते, तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व सोलापूर विकास मंचाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करतानाच सोलापूरच्या विकासाच्या विविध प्रश्नांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, विमानसेवा, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा, औद्योगिक वसाहती, आयटी क्षेत्र, रोजगारनिर्मिती, शिक्षण, आरोग्य तसेच शहराच्या नियोजनबद्ध विकासाची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. केवळ समस्यांकडे लक्ष वेधण्यापुरते मर्यादित न राहता, संबंधित विषयांचा अभ्यास करून त्यावर व्यवहार्य उपाययोजना सुचविणे आणि त्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी शासन व प्रशासनासोबत समन्वयाने काम करणे, ही भूमिका सोलापूर विकास मंचाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला ्
अभियंता दिनाच्या निमित्ताने “तज्ज्ञांचे ज्ञान, नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाशी समन्वय यांच्या माध्यमातून सक्षम, आधुनिक आणि विकसित सोलापूर घडविण्यासाठी एकत्रितपणे काम करूया”, असा संदेश देण्यात आला. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले, केतन शहा, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, मनोज क्षीरसागर, प्रा. प्रसन्न नाझरे, सुहास भोसले, गणेश पेनगोंडा, तेजस गुर्जर, भारत पाटील, शुभांगी पाटील, वासुदेव आडकी, बाळासाहेब मोरे, विशाल जोग, अभय दुस्सल, अमोगसिद्द कोरे, निखिल कंदिकटला, वसंत कुमार आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

No comments:
Post a Comment