आरआरबी व एसबीआय परीक्षेत प्रज्ञा ठोंबरे हिचे दुहेरी यश
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
नातेपुते येथील अहिल्यादेवी पतसंस्थेचे सचिव रवींद्र
ठोंबरे यांची कन्या प्रज्ञा ठोंबरे हिची आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या प्रादेशिक ग्रामीण बँक (आरआरबी) परीक्षेत पीओ स्केल वन पदासाठी निवड तसेच एसबीआयमध्ये ज्युनियर असोसिएट पदी निवड झाली आहे. प्रज्ञा हिने वरील दोन्ही परीक्षेत यश प्राप्त करून दुहेरी निवड होण्याचा मान प्राप्त केला आहे. प्रज्ञा ठोंबरे हिने देदीप्यमान यश मिळवल्याबद्दल शहरातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांनी तिचा सन्मान केला. तिचे शिक्षण डॉ. बा. ज. दाते प्रशालेत इयत्ता दहावीपर्यंत झाले आहे. बारावी यशवंतराव चव्हाण उच्च माध्यमिक इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे आणि पुणे येथील वाडिया महाविद्यालयातून तिने गणित विषयात बीएस्सी पदवी संपादन केली आहे. स्पर्धा परीक्षेतील प्राथमिक व मुख्य टप्पे तसेच मुलाखत यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजनबद्ध तयारी करून तिने हे यश संपादन केले आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल नातेपुते व नातेपुते परिसरात तिचे कौतुक होत असून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

No comments:
Post a Comment