अकलूज नगरपरिषद आरक्षणाची सोडत जाहीर
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत आज दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण १३ प्रभागांमधून २६ नगरसेवक निवडले जाणार आहेत.
द्विसदस्य प्रभागरचनेमुळे या वेळी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध पक्ष आणि उमेदवार आता आरक्षणानुसार आपली रणनिती आखण्यास सज्ज झाले आहेत.
अकलूज नगरपरिषद — प्रभागनिहाय आरक्षण तपशील खालील प्रमाणे आहे.
प्रभाग क्र.१ अ)ना. मा. प्रवर्ग ब)
सर्वसाधारण महिला २.अ) अनुसूचित जाती महिला ब)
सर्वसाधारण ३.अ)अनुसूचित जाती ब)सर्वसाधारण महिला ४.अ)ना. मा. प्रवर्ग ब) सर्वसाधारण महिला
५. अ)ना. मा. प्रवर्ग महिला ब)
सर्वसाधारण ६. अ)ना. मा. प्रवर्ग महिला ब)सर्वसाधारण ७.अ)अनुसूचित जाती महिला ब)सर्वसाधारण
८.अ) ना. मा. प्रवर्ग महिला ब)
सर्वसाधारण ९.अ)अनुसूचित जाती
ब)सर्वसाधारण महिला
१०.अ)अनुसूचित जाती महिला
ब)सर्वसाधारण
११.अ)अनुसूचित जाती
ब)सर्वसाधारण महिला
१२.अ)ना. मा. प्रवर्ग महिला
ब)सर्वसाधारण
१३.अ)ना. मा. प्रवर्ग ब)सर्वसाधारण महिला
नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षणामुळे अनेक नवे चेहरे राजकारणात उतरतील, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
0 Comments