सुवासिक जगताप याची महाराष्ट्र क्रिकेट संघात उप कर्णधार म्हणून निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 9, 2025

सुवासिक जगताप याची महाराष्ट्र क्रिकेट संघात उप कर्णधार म्हणून निवड

 सुवासिक जगताप याची महाराष्ट्र क्रिकेट संघात उप कर्णधार म्हणून निवड




अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित,शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शंकरनगर-अकलूज  (शिवरत्न पॅटर्न,अकलूज) व शिवरत्न क्रिकेट अकॅडमी अकलूज मधील विद्यार्थी कु. सुवासिक जगताप याची 19 वर्ष वयोगटाच्या महाराष्ट्र राज्याच्या क्रिकेट संघामध्ये संघाचा उप कर्णधार म्हणून निवड झालेली आहे.

 याच्या या यशाबद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष  खासदार  धैर्यशिल मोहिते-पाटील, अध्यक्षा तथा शिवरत्न पॅटर्नचे चेअरमन सौ. शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य ,समन्वयक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून अभिनंदन करण्यात आले व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages