चित्रकार ऋत्विज चव्हाण यांचे "नेचर अनवाइंडिंग" चित्र प्रदर्शन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या सोशल मीडियाची ताकद वाढत असताना, त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण प्रदर्शन करण्यासाठी चित्रकार ऋत्विज चव्हाण यांचे निवडक चित्रांचे सोशल मीडियावर प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम वर पाहता येईल, अशी सोय केली गेली आहे. या प्रदर्शनाला "नेचर अन वाइंडिंग" असे संबोधले गेले आहे. आजच्या युगामध्ये सर्वजण स्मार्टफोन वापरत आहेत आणि त्याचाच उपयोग करून हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे अमूर्त शैलीचे लँडस्केप पेंटिंग आणि काही निवडक अमूर्त शैलीची चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. डिजिटल युगामध्ये जागतिक कला दिन याच्या औचित साधून हे प्रदर्शन 15 एप्रिल 2026 दिवशी प्रदर्शित होईल. चित्रकार ऋत्विज चव्हाण यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांना कुठल्याही प्रकारचे चित्राबद्दल शिक्षण झालेले नाही. तरीसुद्धा एका छंदातून त्यांनी व्यवसाइक चित्रकारितेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळी गाठली आहे. ही चित्रे डिजिटल माध्यमातून पूर्ण जगामध्ये पाहता येतील. याचा नक्कीच फायदा चित्रकलेच्या गुणांना वाव मिळण्यामध्ये होईल असे चव्हाण म्हणाले. ही चित्रे ऍक्रेलिक माध्यमांमध्ये बनवलेली आहेत. आणि वैशिष्ट्यपूर्णरित्या ती कॅनव्हास वर मांडली आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सर्वांमध्ये शेअर करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
.png)
.png)
No comments:
Post a Comment